१२८ ही रामाची अयोध्या ! " वेश्या, कंचनी, नायकिणी आणि बडे लोक ह्या मुलांनां विकत घेतात. त्यांचे आम्हांला पाऊणशें ऐशी रुपये येतात. मुलींचे तर शंभर दीडशे रुपये येतात. " “ तुम्ही कोणत्या देवांची आणि देवींचा पूजा करतां ? " " आम्ही भवानीची पूजा करतो. लहानलहान मुलांमुलींनां विकून आम्हांला जे पैसे मिळतात त्यांपैकी थोडथोडे आम्ही भवानीच्या पूजेत खर्च करतो. " शहाजहानपुरच्या आणि मथुरेच्या खुनांचे वेळीं तूं हजर होतास का ? होय, होतो. " .66 >> 66 " आणखी कोणकोण तेथे हजर होतें ? " “रतनदास, देवीदास, देवीदासाची बायको गंगा, दुसरा क्षेमा, त्याची बायको भक्ति, बैराम कोतवाल, सालगा, जानकीदास, छत्रदास, तिलकनायक, स्वरूपी आणि दुसरे पुष्कळ लोक तेथे हजर होते. " या क्षेमा जमादारानंतर रुमालवाल्या ठगांच्या टोळीपैकी शेख एनायतची साक्ष पुढीलप्रमाणे सुरू झालीः- " तुझें नांव काय ? " " शेख एनायत. तुझ्या टोळीचा तूं नाईक आहेस का ? " " नाहीं, मी नाईक नाही. " " " मग तुझ्या टोळीचा मुख्य कोण ? " " पूर्वी माझा बाप हिंगू नाईक होता. हल्ली गुरुबक्ष नाईक आहे. ' तुझ्या टोळींत कितीजण ठग आहेत ? >> << पूर्वी तीनशे होते. पण आतां आमच्या तीन टोळया झाल्या असून प्रत्येक टोळीत ऐशींनव्वद लोक आहेत. "" •. तीनशे लोक एकत्रच देशभर फिरत असत ? ” “नाही. निरनिराळ्या रस्त्यांनी जाऊन कामाच्या वेळी ते एके ठिकाणी जमत होते. यांपैकी कांहीं संन्याशांच्या वेषानें, कांहीं फकिरांच्या वेषानें, आणि कांहींजण शिपायांच्या वेषानें फिरत. हे सर्व एकाच टोळींतले आहेत असे कुणालादि ओळखतां येणे शक्य नसे. " " नबाब सबजीखांचा खून तुमच्याच टोळींतल्या लोकांनी केला का ? " “ होय. नवाब सबजीखांचा खून आम्हीच केला. "
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१२७
Appearance