Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोरखपुर येथील सेशन कोर्ट. १२५ "" भोगावा लागेल. " तेव्हां भवानी आपल्या भक्तजनांनां आश्वासन देऊन म्हणाली “नरहत्या करतांना रक्तपात करूं नका ह्मणजे झाले. त्याप्रमाणेच खून केल्याचे थोडेसुद्धां चिन्ह राहूं देऊं नका. लोकांच्या गळ्याला रुमालाचा फांस घालून त्यांना ठार करावें. तुझ मारलेल्या लोकांचे मृतदेह मी स्वतः नाहींसे करीन. • मग देशांतील राजे किंवा शासनकर्ते यांनां तुमच्या कृत्यांचा सुगावा लागणार कसा ? या युक्तीने माझी आज्ञा पाळतां येऊन तुम्हांला राजदंडहि भोगावा • लागणार नाहीं. भवानीदेवीने आपल्या भक्तांनां असा उपदेश केल्या • दिवसापासून ठगलोक लोकांच्या गळ्याला रुमालाचा फांस घालून त्यांचा नाश करूं • लागले मारलेल्या लोकांची प्रेत भवानीदेवी स्वतः नाहींशी करील अशा पूर्ण समजुतीनें प्रेतें तेथेंच टाकून ते चालते होत. पण जगांत कांहीं सर्वच लोक आंधळे- पणानें विश्वास ठेवणारे नसतात. एकदा ठगांच्या एका टोळीने पुष्कळ लोकांना ठार करून त्यांची प्रेत जागच्या जागीच ठेवली आणि भवानी या प्रेतांना खरोखरच लपविते की काय ते आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहावें ह्मणून ते त्या स्थानापासून कांहीं अंतरावरच्या एका झाडर्डीत लपून बसले. कांहीं वेळानें कालीदेवी नग्नस्थितीतच तेथे यऊन मृतदेह भक्षण करूं लागली. अकस्मात् • कालीची दृष्टि त्या झाडीत लपलेल्या ठगांवर गेली. त्यावेळी नग्नावस्थेत ती नरमांस भक्षण करित होती; अशा स्थितीत आपण इतरांच्या दृष्टीस पडलों, याची तिला फार लाज वाटू लागली. अत्यंत कोपाविष्ट होऊन त्या अविश्वासी ठगांनां तिनें शाप दिला की “ आजपासून तुझा ठगांचें मी रक्षण कारण नाहीं ! तुम्हीं मारलेल्या • लोकांचे देहहि मी लपविणार नाही! " भवानीदेवीच्या या शापाने ठग फारच घाबरले. भवानीचे चरण घट्ट धरून त्यांनी मनःपूर्वक क्षमा मागून तिची पुष्कळ स्तुति केली. त्यांच्या स्तुतीनें संतुष्ट होऊन कालीन सदयांतःकरणाने त्यांनां उःशाप दिला की, “ मी प्रेतें तर आतां लपविणार नाहींच ! पण तुमच्या रक्षणार्थ तुझाला मी एक कुऱ्हाड देतें. " असे म्हणुन देवीने त्यांनां एक कुन्हाड दिली, आणि तेव्हांपासूनच ठग लोकांत कुन्हाड बरोबर बाळगण्याची चाल पडली. काली देवीच्या पूजेच्या ● वेळी टगलोकांच्या गुरूला खांद्यावर एक कुन्हाड घऊन सर्वांच्या पुढे चालावे लागतें. ज्याप्रमाणे सैन्यांत मेजर, कप्तान, स्वार, शिपाई इत्यादि निरनिराळ्या पदवीचे लोक असतात, त्याप्रमाणें ठगांच्या टोळयांतहि निरनिराळ्या हुद्द्यांची माणसे असत. ठगलोकांच्या प्रत्येक टोळींत सभ्य लोकांसारखा पोषाक करून, वाटसरू