Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ ही रामाची अयोध्या ! हल्लींच्या बहुतेक वाचकांनां 'ठग' हे नांव ऐकल्याबरोबर त्यांच्याविषयीं कांहीं अस्फुट कल्पना येईल हें खरें, परंतु त्यांच्या धर्मकल्पना, त्यांचा धंदा, त्यांच्या टोळ्या वगैरेसंबंधानं विशेष माहिती असणे फारसें संभवनीय नाहीं; ह्मणून ठगलोकांसंबंधी या स्थळीं संक्षिप्त माहिती देण्याचा आमचा मानस आहे. कोणत्या काळी, कोणत्या राजाच्या कारकिर्दीत, कशा तऱ्हेनें भरतखंडांत हा ठगसंप्रदाय प्रचलित झाला, यासंबंधानें निश्चयात्मक माहिती अद्यापपर्यंत कोणालाहि उपलब्ध झाली नाहीं. कांहीं शोधकांचे मत असे आहे कीं, मिसर ( इजिप्त ) देशांत प्रथम हा संप्रदाय स्थापन झाला. नंतर क्रमाक्रमानें हळुहळू इतर देशांतून ठगीचा प्रसार झाला. दुसरे कांहीं पंडित ह्मणतात की, हिंदुलोकांच्या तंत्रप्रचारित धर्माचें ठगीपंथ हैं अवश्य भावीफल आहे. परंतु या कथानकांत ठगीच्या समग्र इतिहासाचें पर्या लोचन करण्याचे प्रयोजन नाही. गेल्या शतकाच्या प्रारंभी ठगीच्या अत्याचाराचे स्वरूप काय होतें, एवढ्याबद्दलच प्रस्तुत ठिकाणी उल्लेख आला ह्मणजे पुरे आहे. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी या ठगसंप्रदायावर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारीवर्गाची दृष्टि फिरली. ठगांच्या निर्मूलनासाठी सर वुइल्यम बेंटिक या थोर पुरुषाच्या कारकिर्दीत पुष्कळ उपाय करण्यांत आले व ते बहुतांशी फलद्रुपहि झाले. ठगांचें निर्मूलन करण्याच्या कामावर कर्नल स्लीमनचे नेमणूक झाली. त्या काळी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व भरतखंड या ठगांच्या अत्या- चाराने पीड़ित होऊन गेलें होतें. ठग टोळ्या करून रहात असत. बहुधा प्रत्येक टोळीत ऐशी नव्वद लोक असत. कांही टोळ्यांत दोन दोनशेपर्यंत ठग असत आणि एकदोन टोळ्यांत तर पांचपांचरों ठग असून ते प्रवाशांचे प्राण हरण करण्याचा आपला धंदा निर्धोकपणे चालवित असत. या ठगलोकांच्या धर्मकल्पना कांहीं विलक्षणच होत्या. त्यांच्या धर्माची -अशी एक कल्पना होती कीं, एकदा पृथ्वीवर लोकसंख्या अधिक झाल्यामुळे भवानीदेवीने आपल्या भक्तांनां लोकांचा व्हास करण्याची आज्ञा केली. तिची आज्ञा ऐकून भक्तांनी भवानीला विचारलें कीं " नरहत्या करणारांनां पृथ्वीवरील सर्व देशांत राजे किंवा शासनकर्ते प्राणदंडाची शिक्षा देतात. तुझ्या आज्ञेप्रमाणे जर हैं दुष्कर्म आह्मी करूं लागलों, तर आम्हांलाहि हा राजदंड