Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुप्त मसलत. स्मरण करतांच तो सर्वकाल त्याला सल्ला देऊन खरा मार्ग दाखवितो. संकटपरिहार व्हावा म्हणून मान्ना आणि नूनानें एकाग्रचित्ताने दोन घटका ईश्वराचें स्मरण केलें- पवित्र रामनामाचा जप केला. अकस्मात् त्यांच्या मनांत आशेचा संचार झाला. दोत्रांनीहि आत्महत्येचा विचार मनांतून घालविला. 7 मान्ना म्हणाली " नूना ! आतां आपल्याला भय नाहीं. चल, आपण लखनौला जाऊं. लखनौंतून आपल्याला सहज सोप्या रीतीनं पळून जातां येईल. कसं ? " " मान्नाच्या हृदयांत यावेळीं अपूर्व बलसंचार झाला होता. ती म्हणाली " नूना! माझे पति आणि माझा बंधु माझा शोध करित फिरत आहेत, यांत शंका नाहीं. मल्भ धुंडाळण्यासाठी ते सर्व पृथ्वीपर्यटन करतील. त्यांच्या जिवांत जीव आहे, तोपर्यंत ते माझा शोध करित रहातील. क्षणभरहि विश्रांति घेणार नाहीत. दर्शनसिंहाच्या लोकांनी मला धरून नेलं ही बातमी जर त्यांनां लागली असेल तर ते लखनौ शहरांतच खात्रीनं माझा शोध करित असतील; ह्मणून मला लखनौला गेलंच पाहिजे. तिथं मी गेल्यें, तरच त्यांची माझी भेट होण्याचा संभव आहे. आमचं रक्षण करण्यांत ते आपल्या प्राणांचीहि परवा करणार नाहींत. दर्शन • सिंहाचा किंवा खुद्द बादशहाचा शिरच्छेद करूनहि ते आमची सुटका करतील! आपल्याला या ह्यातारडीबरोबर लखनौला गेलंच पाहिजे. लखनौला पोहोचल्यानंतर पळून जायची तजवीज पाहूं. पण इकडे पहा, त्या थेरडीला यांतला एक शब्दहि केळता कामा नये हो ! तिच्याशी आपल्याला फार सावधगिरीनं वागले पाहिजे. नुना मान्नाचें भाषण लक्ष्यपूर्वक ऐकत होती. ती म्हणाली " ताई, तर मग तुझे लग्न झालं आहे ! तुझे पति आहेत तर मग ? ●मात्रा अश्रुपूर्ण नयनांनी म्हणाली "होय नूना, मला पात, पिता, भाऊ, बहिणी सर्व आहेत. मला वाटतं, बाबांनी माझ्या दुःखानं प्राणत्याग केला असेल. माझ्या दोघी बहिणी मृतप्राय होऊन माझ्या दर्शनासाठी प्राण धरून राहिल्या असतील. माझे पति आणि बंधु या अभागिनीचा शोध करित देशविदेशांतून भटकत असतील. नूना ! माझ्या एका गोष्टीचं स्मरण ठेव. मला जर कधों आत्महत्या करणं भाग पडलं, अन् परमेश्वराच्या कृपेनं तुझी या नरकांतून मुक्तता आली, तर माझ्या बाबांना आणि बंधुभगिनींला माझ्या मृत्यची वार्ता कळीव. एकवार त्यांनां माझा मृत्युशोक सत्य होईल, पण नवाबाच्या अंतःपुरांत माझा "