Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! बराच वेळपर्यंत दोघीहि स्तब्ध होत्या. साधुसिंह व त्याच्याबरोबरचे लोक सकाळी निघणार होते, आणि सकाळ व्हावयाला आतां फक्त दोनअडीच प्रहर अवकाश होता. इतक्या अवकाशांत मुक्ततेचा मार्ग शोधून काढला पाहिजे. कांही वेळाने नूना ह्मणाली " चल, आपण पुरुषाचा वेष घेऊन इथून पळून जाऊं या. 66. नूना ! पग पळून जाणार कुठं ? आपल्याला रस्ते ठाऊक नाहीत. जायचं कुठं अन् कसं ? हल्लींचा काळच असा आहे कीं, पुरुषांनांसुद्धां बाहेर जातांना बरोबर तरवार अन् बंदुक बाळगावी लागते. पुरुषांचा पोषाख जरी आपण घातला, तरी आपण लहान मुलगे दिसूं ! वाटेंत ठग लोक मुलं पकडतात त्यांच्या हातांत आम्ही खास पहूं. नंतर आपलं खरं रूप प्रकट झाल्याशिवाय रहाणार नाहीं. मग त्यांच्या हातून आपलं रक्षण कोण करील? " या वेळीं अयोध्येत चोहोकडे बेबंदशाहीचे साम्राज्य सुरू होतें. कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नव्हता. अर्थात्, चोर, ठग वगैरे लुटारू लोकांचें अयोध्या हें निवासस्थान होऊन राहिले होतें. बरोबर शस्त्रे घेतल्याशिवाय कोणाचीहि बाहेर पडण्याची छाती नव्हती. एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जावयाचें म्हणजे टोळ्या करून जावें लागे; एकटेंदुकटें जाण्याची मुळींच सोय नव्हती. अशी स्थिति असतां तरुण स्रियांनी पळून जाणें म्हणजे चोरांच्या हातांत आयतेंच जाऊन पाडण्या- सारखें होतें. 1 रात्रीचे दोन प्रहर उलटून गेले तरी मान्नाला किंवा नूनाला आत्मरक्षणाचा निर्भय उपाय एकाहे सुचेना. बराच वेळ विचार करून मान्ना म्हणाली " नूना ! तो दयाघन परमेश्वर अनाथांचा नाथ आहे. त्याच्याशिवाय आम्हां दीन अबलांनां दुसरा कोण सहाय्यकारी आहे? त्यानं रक्षण केल्यावर आमचा धर्म नष्ट करण्याचे सामर्थ्य कुणाच्याहि अंगी नाही! माझी आई मला नेहमी म्हणत असे 'संकट पडलं म्हणजे सीतापतीचं स्मरण कर - रामनामानं सर्व संकटं दूर होतात.' व्यर्थ चिंता करून काय होणार ? चल, नूना आपण रामनामाचा जप करूं - त्या भगवंताचं चिंतन करूं. " त्या असहाय दीन अबलांनां आत्मरक्षणाचा कांहींच मार्ग सुचेना, तेव्हां अत्यंत व्याकुळ चित्तानें दीनदयाघन परमेश्वराचा अनन्यभावाने त्या धांवा करूं लागल्या. खरोखर, परमेश्वराचा महिमा अद्भुत आहे! विश्वनियमनाचें त्याचें कौशल्य अचिंत्य आहे. आपल्या हिताहिताच्या ज्ञानांत कुंठित होऊन मनुष्याने त्याचे