प्राक्कथन. रुपये ताबडतोब द्या,' असा त्याने नबाबास हुकूम पाठविला. वारन हेस्तिग्जने काशीचा राजा चेतसिंग याचा अतिशय छळ केल्यामुळे इ. स. १७८१ च्या आगष्ट महिन्यांत काशी येथे बंड झालें. अयोध्येच्या बेगमांपार्शी रग्गड पैसा आहे ही गोष्ट वारन हेस्तिग्ज याला ठाऊक होती व त्याला तर पैशाची अत्यंत - निकट होती. तेव्हां बिचाऱ्या निरापराध वृद्ध बेगमांचा अर्थाअर्थी काहीएक संबंध नसतां, बादरायण संबंध जुळवून, त्यानें आपला मित्र सर इलाजया इस्मे त्याच्या सहाय्यानें खोटा पुरावा जमवून, सदर्हु काशीच्या बंडांत बेगमांचें अंग आहे असें ध्वनित केलें, व फैजाबाद येथें गोमतीच्या कांठीं आपल्या आयुष्याचे शेष दिवस कंांठत असलेल्या त्या वृद्ध बेगमांवर हल्ला करून, त्यांच्या जहागिरी जप्त करण्याचा घाट घातला. ह्या अन्यायाच्या कृत्यांत वारन हेस्टिंग्ज याला सहाय्य करण्यासा हैदरखान बेग नांवाचा एक मुसलमान कुलांगार तयार झाला व या घरभेद्याच्या सहाय्यानेंच शूर इंग्रज सेनापतीने त्या पडदानशनि वृद्ध अबलांवर व त्यांच्य नोकरचाकरांवर भयंकर अत्याचार करून त्यांच्यापासून ७६ लक्ष रुपये पिळून काढले! या राजस्त्रियांची वारन हेस्तिग्जनें केलेली भयंकर विटंबना, मानभंग, अंगावर शहारे आणणारे असे केलेले त्यांचे हालहाल, यांचें वर्णन पार्लमेंटपुढे वाचस्पति बर्क यांनीं करून वारन हेस्तिग्जची फटफजिती केली, ते इतिहासवाचकांस अविदित नाही. वारन हेस्तिग्जचें हें इंग्रजांच्या नांवास काळीमा लावणारें भयंकर कृत्य हिंदुस्थानच्या इतिहासांत अमर होऊन राहिले आहे. असो. असफ-उद्-दौला याच्या पश्चात् वजीर अल्ली नांवाचा त्याचा पुत्र आणि कायदे- शीर वारस गादीवर बसला; परंतु इंग्रजांच्या मेहरबानीनें अयोध्येच्या प्रधानपदावर आरूढ झालेला तफझुल हुसेन ह्याच्या मनांत सुजा-उद्-दौला याचा दुसरा मुलगा सादत अही याला गादीवर बसविण्याची स्फूर्ति होऊन त्यानें एकदम गव्हर्नर जनरलाशी संधान बांधिलें. गव्हर्नर जनरलानेंहि तत्क्षणीं ती विनंति मान्य करून गादीचा खरा वारस वजीर अल्ली याला पदच्यूत केलें व सादत अल्लीला गादीवर बसविलें. या मेहरबानीबद्दल सादत अल्ली व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये पुढील आशयाचा तह ठरलाः- " नबाबांस कोणी शत्रु होईल तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी व मुलुखाचें संरक्षण करण्यासाठी, इंग्रजांनां फौज वाढवावी लागली आहे. त्याच्या खर्चाकरितां नबाबांनी ७६ लक्ष रुपये दरसाल द्यावे. पूर्वीचे कित्येक रुपये बाकी राहिले आहेत
पान:ही रामाची अयोध्या.pdf/११
Appearance