Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशोकवनांत सीता. "बापलेकाचं आणि ह्या म्हातारीचं खडाजंगीचं भांडण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीं जयपालाचं दुखणं विकोपास गेलं. त्याची एकदम वाचाच बंद झाली. कांहीं सांगण्याची अगर कळविण्याची शक्ति त्याला राहिली नाहीं. दर्शनसिंह त्याला इथून लखनौला घेऊन गेला व मी या वृद्ध स्त्रीपाशी राहूं लागल्यें. ही म्हातारी आतां अधिकच उत्साहानं आणि काळजीनं मला नृत्यगीत शिकवूं लागली व मीहि ती कला मोठ्या उत्सुकतेनं शिकूं लागल्यें. ही म्हातारी मला गायालानाचायला शिकवितेवेळीं नहमीं कुरवाळून मोठ्या प्रेमानं सांगत असे 'बेटा ! तूं चांगली गायानाचायाल शिकशील तर खात्रीनं बादशाहाची बेगम होऊं शकशील. थोडीशी मोठी झाल्यावर दर्शन तुला बादशाहाच्या रंगमहालांत पाठवील. ' म्हातारीचं हें भाषण ऐकलं म्हणजे मला अत्यंत आनंद होई. मी अधिकच उत्साहानं आणि काळजीनं नृत्यगायनाचा अभ्यास करीं. माळ्याला, दाईला मी नेहमी आनंदानं सांगें कीं " मी आतां लवकरच बादशहाची बेगम होणार ! परंतु माझं हे भाषण ऐकतांच तीं गालांतल्या गालांत हंसत. असा क्रम अगदी परवांपर्यंत चालला होता. मी नेहमीं मोच्या आनंदांत असें व माझ्यासारखी भाग्यवान् त्रिभुवनांत कुणी नसेल असं मनांत समजत असे. 66 नुक्तंच दाईचं अन् ह्या ह्यातारीचं कांही गोष्टीवरून कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी दाईनं मला एकांतांत भेटून हलकेच माझ्या कानांत सांगितलं कीं, ‘ ही म्हातारी जयपाळची राख होण्यापूर्वी वेश्येचा धंदा करित होती. हिच्यासारखी पापी स्त्री जगांत दुसरी नसेल ! ' राख म्हणजे काय अन् वेश्या म्हणजे कोण, हैं मला कांहींच ठाऊक नव्हतं; परंतु दाईनं तें सगळं मला नीट समजावून सांगितलं. माझ्या बापाचा अन् भावाचा ठग लोकांनी खून केल्याची व पुढं जयपालानं माझा प्रतिपाल केल्याची हकीगत त्याच वेळी दाईकडून मला समजली. तत्पूर्वी माझा असा समज होता की, जयपाल हा माझा बाप अन् ही म्हातारी ही माझी आई. परंतु दाईनं सांगितलेली ती एकंदर हकीगत ऐकून माझा भ्रम दूर झाला. दाईनं मला आणखी असंहि सांगितलं की ' ह्या पातकी वेश्येच्या मनांत माझ्या जन्माचा चाटोळं करण्याचं आहे. ह्या राक्षसीला पापपुण्याची मुळींच भीत नाहीं. दाईच्या तोंडून माझ्या बापाची 9 66 व भावाची हकांगत ऐकतांच मला माझ्या बाळपणांतील कित्येक गोष्टी आठवूं लागल्या. लहानपणी मी दुसऱ्या एका स्त्रीच्या कडेवर बसून खेळत असे. एक वृद्ध गृहस्थ माझं वरचेवर प्रेमानं चुंबन