१०८ ही रामाची अयोध्या ! मी नेहमीं बसलेली असे. व्यापारधंद्यानिमित्त पुष्कळ लोक जयपाला जवळ येत असत.. केव्हां केव्हां माझ्यादेखत 'आमच्या सीतेला अनुरूप असा एखादा ब्राम्हण कुळांतला वर आढळला तर आपल्याला कळवा. असं जयपाल त्या लोकांस सांगत असे! ' माझ्या सीतेला मी दहाहजार रुपये हुंडा देईन!' असें जयपाल म्हणे. सीता हें त्यानंच मला नांव ठेविलं होतं. बाकीचीं सारी माणसंहि त्यावेळी मला सीता याच नांवानं हांक मारीत. जयपाळाच्या वरील भाषणाचा अर्थ काय हें त्यावेळी मला कांहींच करत नव्हतं. पुढं जयपालाला कांहीं दुखणं आलं. आपला ●व्यापारधंदा आटोपून तो ह्या हवेलींत राहूं लागला. त्याच्या दुखण्याच्या • दिवसापासून मी केव्हांहि ह्या हवेलीच्या बाहेर गेल्यें नाहीं. जयपालाचं दुखणं कमी न होतां दिवसेंदिवस वाढतच गेलं. तेव्हां लखनौ येथे त्याला घेऊन जाण्यासाठी दर्शनसिंह इकडे आला. यापूर्वीहि दर्शनसिंह केव्हां केव्हां बापाला भेटण्यासाठी ह्मणून इकडे येत असे. त्याचंहि माझ्यावर प्रेम असे. परंतु ह्या शेवटच्या वेळी जेव्हां तो इकडे आला, त्या वेळी आईशी एकांतांत कांही खलबत करून त्यानं मला नृत्यगोत शिकविण्यास आईला सांगितलं. आतां मला पकं आठवतं, त्या दोघांचं ह्या बाबतीत बराच वेळ कांहीं गुप्त भाषण झालं होतं. दर्शनसिंहाच्या सांगभ्याप्रमाणं आई मला नृत्यगायन शिकवूं लागली. मी त्या वेळीं अवघी दहा वर्षीची होयें. आई मला नृत्यगान शिकवित होती, परंतु जयपालाला ते आवडत नव्हतं. तो वारंवार याबद्दल मला रागं भरे व मी गायालानाचायला शिकूं नये ह्मणून मला कळकळीने उपदेश करी. आईचीहि जयपालानं या बाबतींत एक दिवस खूप खरडपट्टी काढली व मला या असे भलभलते नाद लावल्यास आपल्याला ती गोष्ट. साफ रुचणार नाहीं असं त्यानं आईला बजावून सांगितलं. दर्शनसिंहालाहि तो पुष्कळ राग भरला. काही दिवस त्यांचीं या बाबतीत निकराचों भांडणं चालली होती. त्या तिघांचा बराच वाद होऊन शेवटीं जयपालसिंह आईला व दर्शनसिंहाला म्हणाला ' मी माझ्या पोटच्या कन्येप्रमाणं या अनाथ मुलीचा प्रतिपाळ केला आहे. माझ्या 'दहांत प्राण असेपर्यंत मी कांहीं इला वाईट मार्गाला लावूं देणार नाहीं !' त्यांच्या ह्या भांडणाचा आणि वादविवादाचा कांहींएक अर्थ मला कळत नसे. माझ्या पोरवया- प्रमाणं नृत्यगान शिकण्यांत मला अतिशय आनंद वाटे. आई मला चोरून नाचायाला गायला शिकत्री व मीहि मोठ्या उत्साहानं आणि जयपालाला कळू न देतां ती कलह शिकू लागल्यें.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१०७
Appearance