अशोकवनांत सीता. १०७ नूना दीर्घ निःश्वास टाकून ह्मणाली "माझ्या इच्छे अनिच्छेला कोण विचारतं?” नूना ! तूं आपला धर्म टाकगार? सतीत्वापासून भ्रष्ट होणार? मुसलमानाची तूं विलासदासी होऊन रहाणार ? 66 " नूना आतां अधिकच खिन्न होऊन ह्मणाली “ताई धर्म अधर्म कशाला ह्मणतात, सतीत्त्व ह्मणजे काय, ते मला ठाऊक नाहीं. बाळपणीं सदासर्वदा मी जयपाळ सिंहाच्या बरोबर असें. दररोज त्याच्याबरोबर त्याच्या पेढीवर जाई. पुढं नऊ वर्षांची झाल्यावर जयपालसिंह इथून कोणीकडे निघून गेला व मी त्या दिवसापासून या हवेलींत आईबरोबर रहात आहे. ह्या बगीच्या बाहेर कधीं एक दिवसहि गेल्यें नाहीं. तूं दुखण्यांत जेव्हां भ्रमिष्ट झाली होतीस, त्यावेळी तुझ्या मुखांतून नानाप्रकारची चमत्कारिक आणि असंबद्ध भाषणं ऐकून माझ्या मनांत नाना शंकाकुशंका उत्पन्न झाल्या. त्यापूर्वी जगाची मला कांहींएक माहिती नव्हती, हैं मीं तुला नुकतंच सांगितलं आहे. श्रमामधें 6 तूं प्राणनाथ ! जीवितेश्वर !' वगैरे वगैरे बडबडत असस. 'दादा, बाबा, ताई, ' ह्मणत असस. मला पहातांच 'अयोध्यानाथ! अयोध्यानाथ !' झणून ओरडत असस. माझं तोंड हातांत घेऊन ' हा अगदर्दी थेट तिकडच्या- सारखाच चेहरा आहे !" वगैरे वगैरे तूं जें नाना प्रकारचं असंबद्ध भाषण करित असस, त्याचा मला कांहींच उमज पडेना. ' प्राणनाथ ' ह्मणजे कोण, 'जीवितेश्वर' कुणाला ह्मणतात, दादा, बाबा, कसे असतात, ह्यांची मला कांहींच कल्पना नसल्यामुळे ह्या साऱ्या गोष्टींचा तुझ्यापासून उलगडा करून घ्यावा अशाविषयों तेव्हांपासून माझ्या मनाला सारखी चुटपुट लागून राहिली होती. तुला विचारीन विचारीन ह्मणून मी आज केव्हांपासून तरी योग्य संधि पहात होत्यें, पण हा क्षणपावेतों तशी संधीच कधी मिळाली नाहीं. " ती रोगी स्त्री म्हणाली "तर मग आतां सांग. तुझी सर्व गोष्ट मी उत्सुकचित्तानं ऐकत्यें. " 46 • ताई, ती फार लांबलचक अन् कंटाळवाणी हकीगत आहे -" 22 " कशीहि असो, तुझी सविस्तर हकीगत मला लवकर सांग. “ ऐक तर मग. " असे म्हणून नूनानें आपली हकीगत सांगण्यास प्रारंभ केला. नूना म्हणाली " ताई, दर्शनसिंहाचा पिता जयपालसिंह हा माझ्यावर कन्येप्रमाणं झेम करित असे. सहासात वर्षांपूर्वी तो इथून निघून गेला. तो मला कडेवर घेऊन दररोज आपल्या पेढीवर घेऊन जाई. पेढीवर त्याच्या शेजारी बाळपणीं
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१०६
Appearance