Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! ह्या वृद्ध स्त्रीला आई असें ह्मणत असे. ती वृद्धाहि दर्शनसिंहावर मुलाप्रमाणे प्रेम करी. असो. सभोंवार उंच तटानें परिवेष्टित अशा एका विस्तीर्ण बगीच्याचे मध्यभागी एक दुमजली लहानशीच पण टुमदार अशी राजा जयपालसिंहाची हवेली होती. माडीवर एक मुख्य दिवाणखाना असून दुसऱ्या तीनचार खोल्या होत्या. तळमजल्यावर एका खोलीत दोन गाई बांधिल्या होत्या. दुसऱ्या दोन खोलींत बगीच्याची व्यवस्था पहाणारे दोघे माळी रहात. एका खोलीत स्वयंपाक घर होतें. वर जी स्त्री सांगितली, तिच्या सेवेस बुंदिया नांवाची एक स्त्री होती. बुन्दियाला सर्वजण दाई म्हणून हांक मारित असत. मागील प्रकरणांत वर्णिलेला बादशहाचा दरबार भरल्याच्या तिसरे दिवशीं दोन प्रहरांच्या सुमारास पांचपन्नास मंडळी हत्ती, पालख्या, मेणे वगैरे वाहनें घेऊन राजा जयपालसिंहाच्या वगीच्याच्या दरवाज्यापाशीं आली. हवेलींत रहाणारी वृद्ध स्त्री यावेळीं नुकतीच भोजन उरकून माडीवरील दिवागखान्याच्या खिडकींत आली होती. तिच्या दृष्टीस ते लोक पडतांच तिनें बुंदियाला हांक मारून म्हटलें " दाईं ! पहा पहा, हत्ती, पालख्या घेऊन आपल्याकडे कोण येत आहेत ते? मला वाटतं, दर्शननं ह्या लोकांस पाठविलं असावं. आम्हांला लखनौला घेऊन जाण्याकरितां हे आले असावेसं दिसतं. त्या वद्ध स्त्रीच्या आज्ञेप्रमाणे बुन्दिया दरवाज्यापाशीं चौकशी करण्याकरितां गेली. त्या लोकांपैकी एकजण पुढे होऊन म्हणाला “आम्ही लखनौ हून आलो आहो. राजा दर्शनसिंहांनी आम्हांला पाठविले आहे. माझें नांव साधुसिंह माईसाहेबांस " खबर द्या. दाईनें परत येऊन साधुसिंहाचा निरोप त्या वृद्ध स्त्रीस कळविला. दर्शनाच्य ह्या विश्वासू साधुसिंह नोकरास ती वृद्ध स्त्री चांगल्या रीतीनें ओळखित होती. दिवाणखान्यांत त्या वृद्ध स्त्रीशिवाय आणखीहि दोन स्त्रिया यावेळी बसल्या होत्या. त्यांतील एकीचें वय चौदापंधरा वर्षांहून अधीक नसावेंसें दिसत होते. दुसरी चीस वर्षे वयाची होती; परंतु ती रोगानें आणि काळजीनें अगदीं क्षीण व निस्तेज झालेली दिसत होती. बापडीच्या हाडांचा नुसता सांगाडा झाला होता. झातारी आतां खाली उतरली. साधुसिंहहि इतक्यांत तेथें आला. ह्यातारीला पहातांच साधुसिंहाने भूमीवर लोटांगण घालून तिला प्रणाम केला. म्हातारीनें . विचारलें " दर्शन खुशाल आहेना ? "