अशोकवनांत सीता. प्रकरण ११ वॅ. अशोकवनांत सीता. दुःखाती रुदती सीता वेपमाना तपस्विनी । चिंतयंती वरारोहा पतिमेव पतिव्रता ॥ - सुन्दरकाण्डम् । रामायणम् । इ. स. १८५७ सालच्या बंडापूर्वी कानपुर हें कांहों मोठ्याशा प्रसिद्ध शहरांत गणले जात नव्हतें. रोहिलेयुद्धानंतर इ. स. १७७७ साली कानपुर येथे इंग्रजी सैन्याच्या छावणी (Cantonment ) ची व्यवस्था करण्यांत आली, व तेथपासून या शहराच्या व्यापाराची वगैरे भरभराट होत गेली. तरी अगदी परवांपर्यन्त कानपुर मोठेंसें प्रसिद्ध शहर नव्हते. आमच्या कथानकाच्या प्रसंगी तर कानपुरच्या आसपास चोर, दरवडेखोर, ठग इत्यादि लोकांनी भयंकर उपद्रव मांडला होता. कानपुर शहरांत वायव्येकडच्या भागांत इंग्रज लोक रहात असत. या भागांतील रस्ते, घरें, दुकानें, चौक अगदी स्वच्छ आणि रमणीय होते. खुद शहरांतहि जागजागीं अनेक बगीचे होते. शहर मोठें त्रिस्तीर्ण असून मोठमोठया श्रीमान् लोकांच्या भव्य हवेल्यांनी त्याची शोभा वृद्धिंगत होत होती. अयोध्येच्या बादशहाचा सध्याचा सेनापति राजा दर्शनसिंह याचा पिता राजा जयपालसिंह हा पूर्वी या कानपुर शहरांत रहात होता. त्याचा जन्म जरी रजपूतवंशांत झाला होता, तरी कालमहात्म्याप्रमाणें युद्धव्यवसाय सोडून देऊन त्यानें वणिरवृत्ति स्वीकारली होती. राजा जयपालसिंहाला त्याच्या बापानें बराच पैसा ठेविला होता.. व्यापारधंदा करून जयपालसिंहानेंहि विपुल पैसा मिळवून आपल्या वडिलार्जित संपत्तीची वृद्धि केली होती. आमच्या कथानकांतील प्रस्तुत गोष्ट घडण्याच्यापूर्वी सुमारें सहासात वर्षे वार्धक्यामुळे आपला व्यापारधंदा आटपून राजा, जयपालसिंह आपल्या पुत्रासह लखनौपासून चारपांच कोसांवरील एका गांवों जाऊन राहिला होता. जयपालची लहानशीच पण टुमदार हवेली, त्या हमेली भोवती असलेला विस्तीर्ण बगीचा, वगैरे जमीनजुमला कानपुर येथे अद्याप त्याच्याच मालकींत होता. ह्या हवेलींत सांप्रत एक वृद्ध स्त्री रहात असे, दर्शनसिंह
पान:ही रामाची अयोध्या.pdf/१००
Appearance