पान:ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय - दामोदर हरी चापेकर.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिमानी मर्द नाही म्हणून खेकसू लागले. गावात दररोज नवीन जुलमाचे प्रकार होऊ लागले. कित्येक ठिकाणी देवस्थाने भ्रष्ट केली कित्येक ठिकाणी बायकांच्या अब्रवर अपहार केला. देव फोडले. गोरगरिबाचे या बंडखोरानी नुकसान अतोनात केले. असा प्रकार चालला असता दररोज खडकीहून पुण्यास येऊन पुन्हा संध्याकाळी परत जात होतो. ऐन उन्हाच्या वेळी खडकीहून पुण्यास जाणे आणि खडकीस येणे हे कृत्य आमच्या वडिलास आवडले नाही. त्यांनी आम्हास परोपरीने सांगितले बाळानो, हे तुमच्या प्रकृतीस मानवणार नाही. पण आम्हाला हे काम कर्तव्य असल्यामुळे लपून छपून पुण्यास जाणे सोडले नाही. हे वडिलांस समजून ते रागवले आणि पुण्यास येऊन राहिले. तसे आम्ही सर्व मंडळींसह खडकीचा बाग सोडून पुण्यास येऊन राहिलं. तापाची साथ शहरात जोराने चालू होती. पण आम्हाला एक आनंद जाहला की, आता प्रयत्न करावयास सुलभ

तापाच्या साथीत भिस्कुटेचा मृत्यू

इतक्यात आमचा प्रियमित्र भिस्कुटे दत्तात्रय या दुष्ट तापाने आजारी झाला. ज्या दिवशी तो तापाने आजारी झाला त्या दिवशी तो आमच्याकडे येऊन ताप आला म्हणून बोलला पण त्यानीच सांगितले की घाबरू नका. ताप साधा आहे. असे म्हणून तो घरी निघून गेला. तो पुन्हा आम्हास भेटला नाही. त्याची आमची मित्रता आहे असे त्याच्या घरच्या माणसाना ठाऊक नव्हते म्हणून आम्हाला त्यांच्या घरी समाचारास जाता येईना. म्हणून मी धाकटे भावास त्याच्या तपासास पाठविला पण या बंडखोराची भीती ज्याच्या त्याच्या मनांत असलेमुळे कोणीही भिस्कुटे आजारी आहे हेच कबूल करीना. हरहर परमेश्वरा! काय ही आम्हा हिदू लोकांची पराधीनता कळसास जाऊन पोचली. भिस्कुटचाचा पत्तासुद्धा आम्हास कळेना या दुष्टाचे पारिपत्य करून ही खबर भिस्कुटयानी आजारीपणांत ऐकली पाहिजे. असे म्हणून आम्ही फार परिश्रम केले. पण तसा योग न येता भिस्कुटे आमचा त्याग करून परतले, अशी वार्ता मात्र आमच्या कानी येऊन आदळली त्यावेळेस आम्हास परमावधीचे दुःख जाहले. अशा कामी जिवाचा मित्र मिळणे किती कठीण आहे याचा विचार प्रत्येकाने करावा. आमच्या दुर्दैवाने तो आम्हास लाभला नाही. आम्ही गावाबाहेर जाऊन वर वर हात करून आकाशाकडे पाहून तोंडाने बोललो की, तू आमच्याबरोबर स्वधर्म हिताच्या कामास पुष्कळ अटलास याबद्दल ईश्वर तुला सद्गति देवो. लौकरच चांडाळाची रवानगी यमलोकास करून देतो. तू काळजी करू नकोस. यापेक्षा तुझी मार्ग आम्हास नाही. असे भिस्कुटयास बोलून आशा फडण्यास दुसरा देहाच्या क्षणभंगुरपणाविषयी विचार करीत करीत गावात आलो. मित्राची