पान:ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय - दामोदर हरी चापेकर.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फौजेचा उपयोग परचक्र आल्यावर कोणी करीलपण हे आमचे इंग्रज हकदार आणि यांची मर्दानी फौज बंदुका आणि संगीना घेऊन अभागी झालेल्या अर्धमेल्या रयतेवर स्वारी करून त्यांना काबीज करून इस्पितळात रवाना करतात. धन्य आहे की नाही त्यांची. नाहीतर आम्ही त्यांची फौज कोणीही मारील पण विशेष म्हणजे आजारी झालेलेना त्यांचे एक पाऊलही वाया जात नाही, त्या लोकास हस्तगत करणे हाच मर्दानी होय असे आमचे इंग्रजांचे म्हणणे. म्हणून तर त्यांनी त्याकरिता कवाईत शिकवून तयार केलेली पलटण उपयोगात आणली. अशा तन्होने या बंडखोराची लूट सुरू झाली. या लुटीबरोबर आम्ही नेहमी जात होतो. जावयाचा उददेश, अन्याय स्वचक्षन पहावयाचा, मा त्याला तपासणी म्हणण्या- पेक्षा लूट म्हणणे पसंत करीतो. ही लूट चालू असली म्हणजे ऍडसाहेब मुख्य त्यामध्ये . असे बडे बडे काही इकडून तिकडे फिरत असायचे. म्हणजे कुलुपे कशी तोडतातमाल लांबवितात कसे, झोटिंगशाही काय चालली आहे, बरोबर काम करितात की नाही याची देखरेख यांचेकडे होती. त्यावेळेस यांच्या डोक्यांत एक प्रकारची धंदी असते. तीमुळे ते कोणाही हिंदु गृहस्थास ओळखत नाहीत. बंडखोर मंडळीना, नाही तिकडे जाळपोळ, पाडतोडधरपकड याखेरीज दुसरे आढळत नसे. ज्यांनी हा देखावा पाहिला असेल तो या नराधमाना बंडखोरावाचून दुसरी उपमा देतील असे मला वाटत नाही. ही लूट कोणत्या प्रकाराने होई याविषयी नियम केले होते. त्या लेखी नियमांत पुष्कळ सौम्यपणा ठेविला होता. वर्तणुकीमध्ये त्याच्या अग अगदी उलट प्रकार दृष्टीस पडत असे. नियमांत कोणाच्या देवधर्म सोवळेओवळे याचा जेणेकरून उपमर्द होईल अशी वागणूक कोणी करू नये असा स्पष्ट उल्लेख आहे. पण वागताना हे गोरे मुद्दाम आम्हांला चीड उत्पन्न होईल अशी वर्तणूक अमलांत आणीत असत, आणि हा प्रकार रॉडसाहेब मोठ्या खुषीने पाहत असे. यावेळेस जी आमच्या मनाची स्थिती होत असे ती लिहिण्यास आम्ही असमर्थ आहोत.

रॉडसाहेबाचा खून करण्याचा निश्चय

आम्ही निश्चय केला की, याचा जीव घ्यायचा, सोडायचा नाही. असा एक निश्चय झाल्यावर आम्ही त्या तयारीस लागलो. आमच्याजवळ नुसत्या तलवारी होत्या. दोन पिस्तुले होती. पण दारू नव्हती म्हणून ती निरुपयोगी होती शीघ्र काम करण्यास पिस्तुले चांगले. पर काय करिता, साहित्य आणा कुठून. तलवारीनेच आम्ही काम करावयाची उमेद धरला. आमच्या जवळ असलल्या तलवारीहून दोन तलवारी त्याला गळ्यांत उत्तम निवडून काढल्या. अडकविण्याकरिता पटे लविले. काळे म्यान होते त्यास पागोटे गुंडाळून ते पांढरे केले. अशी तयारी करून आम्ही जागा शोधू लागलो. पण आम्हाला दुसरी