पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८१

पाण्याचा पुरवठा कमी असल्यामुळे कांहीं कांहीं ठिकाणी ह्या

उद्योगापासून जितका फायदा व्हावा तितका होत नाहीं. व दुसरा गोष्ट अशी की, इरिगेशनपेक्षा कमी खर्चाने कांहीं कांहीं ठिकाणी झाडे लाविल्याने हा हेतु सिद्धीस जाणार आहे.*

झरे.

 आतां, आपल्या नद्यांस, ओढ्यांस, तळ्यांस व विहिरींस पाणी कोठून येते ते पाहू. विहिरींस तर झऱ्यांंपासून पाणी येते हे सर्वांस माहीत आहेच. तळीं मात्र दोन प्रकारची असतातः कित्येक तळ्यांस फक्त सांठलेले पाणी असते व कित्येकांस झरे असूनही सांठलेले पाणी राहते. ह्यांपैकी दुसऱ्याच प्रकारची तळीं चांगलीं. कारण, त्यांपासून पाण्याचा चांगला पुरवठा होण्यासारखा असतो. ओढे

-----

 * इ० स० १८०२ मध्ये अलेक्झांडर व्हान् हंबोल्ट साहेब हे वेनेजु- एला देशामध्य अॅॅराग्युवा नदीचा खोरा पाहण्यास गेले होते. त्या ठिकाणी सभोवतालच्या टेकड्यांपासून पाणी मिळून एक सरोवर झाले होते, व ह्या सरोवरांतील माशांवर तेथील लोकांचा उदरनिर्वाह होत असे. हंबोल्ट साहेब येण्याच्या पूर्वीच या टेकड्यांवरील जंगलाचा नाश केला होता, व त्यामुळे तळ्यास पाण्याचा पुरवठा कमी होऊन त्यांतील मासे कमी झाल्यामुळे लोक फार फिकिरीत होते. झाडांचा नाश झाल्यामुळे अशी स्थिति घडून आली हे हंबोल्ट साहेबांचे तेव्हांच लक्षात आले. पुढे इ० स० १८२५ मध्ये बुसिन्कोल्ट साहेब त्याच ठिकाणी जाऊन पाहतात तो जंगल पुनः वाढू लागले होते, व त्यामुळे तळ्यांतील पाणीही वाढू लागले होते.