पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/92

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.भाग ५ वा.
---------------
पाण्याचा संचय.

 आतां, तिसरी अवश्यकता म्हणजे पडलेले पाणी साठवून ठेवणे ह्याविषयी विचार करूं.

पाटबंधारे.

 पडलेले पावसाचे पाणी अडवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे, हे मागें सांगितलेंच आहे. व त्यांतही हे पाणी उच्च ठिकाणीं सांठून राहील तर जास्त उपयोगी आहे. पावसाचे अवश्यकतेविषयीं कोणास संशय आहे असे नाहीं; परंतु पाऊस पाडणें मनुष्याचे आधीन नाहीं. अशा समजुतीवर आजपावेतों ह्यासंबंधानें कोणीं कांहीं प्रयत्न केलेले नाहींत. अलीकडे हा विषय आपले सरकारास समजत चालला आहे व ते झाडांच्या वृद्धीस उत्तेजन देत आहे. तथापि, अद्यापपावेतों झाडांच्या योगाने पाऊस पडण्यास साहाय्य होते की काय, याजबद्दल वाद सुरू असल्यामुळे सरकारची या संबंधानें पूर्ण खात्री झालेली नाहीं. झाडांच्या वृद्धीपासून इतर फायदे कांहीं नसते, तर सरकारने ह्या कामांत हात घातला असता कीं नसता, ह्याबद्दलही संशयच वाटतो. असो; कोणत्याही समजुतीनें कां होईना, हे स्तुत्य कृत्य आपला परिणाम करणारच ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे. पावसाची गोष्ट ह्याप्रमाणे आहे. परंतु तिसरी अवश्यकता म्हणजे पाण्याचा संचय करून ठेवणे ही ह्या देशास