पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७४

घाटमाथ्यावर पावसाची शिकस्त, पुढे कांहीं प्रदेशांत अल्पवृष्टि, आणि त्याच्यापुढे पुनः अधिक अशीं माने झालीच पाहिजेत. मोटेच्या पाण्याचे प्रवाहांत आपण आपला हात जर प्रतिबंधासारखा ठेविला, तर त्या प्रतिबंधाचे अलीकडे पाणी थोपून राहून प्रतिबंधावरून जोराने झुगारून दिल्यासारखे होऊन ते लांब जाऊन पडते. ह्याप्रमाणेंच, पावसाचे ढगांचा प्रवाह समुद्राकडून जमिनीकडे येत असतो, त्यास मध्ये घाटाचा प्रतिबंध झाल्यामुळे कोकणपट्टींत पुष्कळ आणि घाटमाथ्यावर अतिशय असा पाऊस आढळतो. परंतु ह्या प्रतिबंधाने आणि मागील वाऱ्याच्या जोराने जे ढग उडवून दिल्यासारखे होतात, ते घाटापासून खालीं फार दूर अंतरावर येतात. ह्यामुळे घाटमाथ्याच्या शेजारी पाऊस फार कमी असतो आणि पुढे जास्त वाढत जातो. तथापि, ह्या वाढीस बंगालचे उपसागराचा प्रवाह मुख्यतः कारणीभूत होतो, हे ध्यानांत ठेविले पाहिजे. नागपुरास पावसाचे वर्षाचे मान ४२ इंच, चंद्रपुरास ६० इंच, रायचुरास ५० इंच, संबळपुरास ५४ इंच, कटक एथे ६७ इंच ह्याप्रमाणे पूर्वेकडे पावसाचे मान वाढत जाते.

उपसंहार.

 अतिवृष्टीचा प्रदेश आहे तेथे दुष्काळ पडण्याची बिलकूल भीति नाहीं. परशुरामक्षेत्र ( काकण ) ह्या ठिकाणी दुष्काळ कधीही पडणार नाही, म्हणून जो वर आहे तो सुप्रसिद्धच आहे. अधिक वृष्टीच्या ठिकाणी दुष्काळ बहुतकरून पडत नाहीं. अनावृष्टि