पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



७२

भाग ह्या प्रांतांमध्ये अधिक वृष्टि तर असतेच. परंतु एथील पाऊस फार निश्चित असतो. ह्याचे कारण हा प्रांत डोंगराळ असून जंगलयुक्त आहे, हे एक; परंतु ह्याशिवाय नैऋत्येकडून अरबी समुद्राचा प्रवाह व पूर्वेकडून बंगालचे उपसागराचा प्रवाह वाहात असल्यामुळे त्या दोन्ही वाऱ्यांंच्या कलहाचा हा प्रांत आहे, ह्यामुळे एथें पाऊस हटकून विपुल पडतो. ( ह्या भागांतील, विशेषेकरून एतद्देशीय संस्थानांतील महत्त्वाच्या जंगलांचा अलीकडे बराच नाश झाला आहे. )

 अल्पवृष्टीचा प्रदेश :--- हे प्रदेश दोन आहेत. ह्यांपैकी पहिला काठेवाड, गुजराथचा पश्चिम भाग, राजपुतान्याचा पूर्वभाग, पंजाबचा अतिवृष्टि व अनावृष्टि ह्या प्रदेशांमधील भाग, व वायव्येकडील प्रांताचा पुष्कळ भाग म्हणजे आग्र्यापासून अलहाबादे- पर्यंत सुमारे अर्धा प्रांत हा होय. दुसरा जो अल्पवृष्टीचा प्रदेश आहे त्याचे वर्णन पुढे येईल. वर सांगितलेल्या ठिकाणीं अल्पवृष्टि होण्याचे कारण असे की, ह्या भागाचे पश्चिमेस अनावृष्टीचा प्रदेश आहे. अरबी समुद्राकडून जो पावसाचा प्रवाह येतो तो खंबायतचे आखातांतून मध्य हिंदुस्तानाकडे वळला जातो. हा प्रवाह उत्तरेकडे न जातां पूर्व दिशेकडे वळण्याचे कारण, ह्या वेळेस व ह्याचे पूर्वीही काठेवाड, कच्छ, सिंध व राजपुतान्याचा पश्चिमभाग ह्या ठिकाणी वायव्येकडील वारा वाहात असतो; व हा वारा अरबस्तान, इराण, व बलुचिस्तान वगैरे रुक्ष प्रदेशांकडून येत असल्यामुळे कोरडा असतो; व नैऋत्येकडच्या नियतकालिक वाऱ्यास पुढे जाण्यास अड-