पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/84

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७१

बंगालचे उपसागरांतून वायव्येकडे जो पावसाचा प्रवाह जातो, तो एथपर्यंत येईपावेतो बहुतेक कोरडा होतो. शिवाय, हे प्रांत बहुतेक वाळूचे असून रुक्ष असल्यामुळे त्या ठिकाणीही पाण्याची वाफ नसते; म्हणून पाऊस पडण्यास साहाय्य होत नाहीं.

 अधिक वृष्टिचा प्रदेश :–पुढे अल्पवृष्टीचे दोन प्रदेश सांगितले आहेत, तेवढे खेरीजकरून बाकीच्या राहिलेल्या सर्व प्रांतांत अधिक वृष्टि होते. घाटमाथ्याच्या लगत पूर्वेस थोडा अधिक वृष्टीचा प्रदेश आहे. एथे अधिक पाऊस पडण्याचे कारण, उघडच आहे. घाटमाथ्यावर पावसाची शिकस्त होत असल्यामुळे त्याच्या लगत अधिक पाऊस पडलाच पाहिजे. कर्नाटकामध्ये पाऊस अधिक पडण्याचे कारण तेथे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर ह्या दोन्ही ठिकाणांपासून पावसाचा पुरवठा होतो, व शिवाय मद्रासच्या किना-यावर ईशान्येच्या नियतकालिक वाऱ्याचाही विशेष जोर असतो. अतिवृष्टीचे नजीक आधिक वृष्टि होणे साहजिक आहे, हे वर सांगितलेच आहे. म्हणून हिमालयाच्या अतिवृष्टीनजीक अधिक वृष्टि होते. तसेच बंगाल, बहार, ओरिसा, अयोध्या, मध्य हिंदुस्तान ह्या ठिकाणी पावसाचे दोन प्रवाहांचा अम्मल असतो. एक मोठा प्रवाह, बंगालचे उपसागरांतून येतो; व दुसरा, तापी व नर्मदा ह्यांच्या मुखांच्या बाजूने येतो; ह्यामुळे जास्त पाऊस पडतो.

 सातपुड्याचे डोंगराळ प्रदेश, जोधपूरचे पठार, बहुतेक सेंट्रल प्राव्हिन्सेस, व मध्य हिंदुस्तानांतील एतद्देशीय संस्थानांचा कांहीं