पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६६

शिवाय जमिनीवर थंडी कमी करण्यास जी इतर कारणे आहेत, त्यांमध्ये झाडे हीं फार महत्त्वाची आहेत. झाडे उष्णता कशी कमी करितात, हे मागें स्पष्टपणे सांगितलेंच आहे. सारख्याच उंचीच्या दोन स्थानांपैकी एकावर झाडे असलीं, व एकावर ती नसलीं, तर झाडे असलेले स्थान अधिक थंड असते. म्हणून समुद्राचे पृष्ठभागापेक्षा जमिनीवर उष्णता कमी असण्यास जमिनीचा उंचपणा व झाडे हीं कारणीभूत होतात. व पाऊस पडण्यास थंडी हे जे एक अवश्यक कारण ते जमिनीवर स्वभावतःच असल्यामुळे पाऊस पडतो.

 आतां, पाऊस पडण्यास जे दुसरें अवश्यक कारण म्हणजे वाफ असलेल्या हवेमध्ये आणखी वाफ घालणे तेही जमिनीवर बरेच असते. नदी, नाले, तळीं, विहिरी ह्यांच्या पाण्याचे व मनुष्ये जे पाणी खर्चितात त्याचे नेहमीं बाष्पीभवन होत असते; व ती वाफ जमिनीवरील हवेमध्ये नेहमी मिसळलेली असते, व ती पाऊस पाडण्यास कारणीभूत होते.

 त्याचप्रमाणे, एकदां पाऊस पडण्यास सुरुवात झाली म्हणजे त्या पावसापासून जो थंडावा उत्पन्न होतो, व पडलेल्या पावसाचे जे बाष्पीभवन होते, तेही आणखी पाऊस पडण्यास कारण होते. परंतु, ह्या सर्वांपेक्षा वाफेचा विशेष पुरवठा म्हटला म्हणजे झाडांपासून आहे. मागें, एके ठिकाणी सांगितलेच आहे की, झाडे आपल्या पानांच्या पृष्ठभागाचे द्वारे नेहमीं बाष्पीभवन करीत असतात. जमिनीतील ओलावा मुळांचे योगाने शोषून घेऊन पानांच्या द्वाराने