पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६४

मध्ये जमिनीवरील वाफ मिसळल्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे हवेंतील वाफेचे पाणी होऊन पर्जन्यरूपाने जमिनीवर पडते.

झाडे व पाऊस ह्यांचा अन्योन्य संबंध.

 आपल्या देशांत पाऊस येतो कोठून ह्याबद्दल वर स्पष्टीकारण झालंच. व ते पडण्यास अवश्य कारणे कोणतीं ह्या विषयींही दिग्दर्शन वर केलेच आहे. आतां, ह्या दुसऱ्या गोष्टीविषयी विशेष विचार करूं.

 समुद्रावरील वाऱ्यातील वाफेस जमिनीवर येतांक्षणींच जास्त थंडी लागण्याचे कारण काय ? पदार्थविज्ञानशास्त्राचा असा एक नियम आहे की, समुद्राचे पृष्ठभागापासून जितकें जितके उंच जावें, तितकी तितकी थंडी जास्त. समुद्राचे पृष्ठभागाचे वर जास्त थंडी कां असते, ह्यास अनेक कारणे आहेत. त्यांत मुख्य दोन आहेत: पहिले कारण असे की, घन हवेपेक्षां विरल हवा तापण्यास जास्त उष्णता लागते. पृथ्वीचे पृष्ठभागाशी हवेवर दाब जास्त असतो, ह्यामुळे तेथील हवा जास्त घन असते. पृष्ठभागापासून उंच उंच जाऊं लागलें असतां दाब कमी कमी होत गेल्यामुळे हवा जास्त विरल होत जाते. दुसरे कारण असे की, सूर्याची किरणें परावर्तन पावून जाऊं लागली म्हणजे ती पृष्ठभागाजवळ घोटाळतात, त्यामुळे तेथे उष्णता जास्त भासते. उच्च स्थानी थंडी जास्त असते, हे आपल्या नेहमी पाहण्यांत येते. हिमालय पर्वताच्या शिखरांवर अक्षय्य बर्फ असते, ह्याचे कारण ती शिखरें फारच उंच असल्या कारणामुळे तेथे अतिशय थंडी असते. आपल्या इकडे माथेरान, महाबळेश्वर एथील हवा अति-