पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६३

बर वाफेचे पाणी होणार नाहीं. तितक्याच हवेला तितक्याच

वाफेने विरण्याची परमावधीची स्थिति आणण्यास नियमित उष्णमान लागते. म्हणून उष्णता कमी कमी करितां वर सांगितलेल्या उष्णमानास उष्णता येऊन पोहोंचेपर्यंत त्या वाफेचे पाणी होणार नाहीं. ह्या पुढे मात्र उष्णता कमी केली असतां वाफेचे पाणी होऊ लागेल; व जितकी जास्त उष्णता कमी करावी, तितकें जास्त वाफेचे पाणी होईल. ह्याचप्रमाणे तसल्याच म्हणजे विरण्याची परमावधीची स्थिति प्राप्त न झालेल्या हवेमध्ये जास्त वाफ घालू लागलो, तर काय होईल ? हवेस ती स्थिति प्राप्त होईपर्यंत त्या हवेमध्ये जास्त वाफ मावेल. परंतु ती स्थिति प्राप्त झाल्यावर जितकी जास्त वाफ घालावी, तितकीचे पाणी होईल. ह्यावरून असे सिद्ध होते की, हवेमध्ये असलेल्या वाफेचे आपणांस पाणी करावयाचे झाल्यास त्या हवेची उष्णता कमी केली पाहिजे; अगर त्या हवेमध्ये आणखी वाफ घातली पाहिजे; अगर ह्या दोन्ही क्रिया एकदम केल्या पाहिजेत.*

 नैर्ऋत्येच्या नियतकालिक वाऱ्यामध्ये वाफ बहुतेक विरण्याच्या परमावधीच्या स्थितीस प्राप्त झालेली असते. ती जामिनीकडे येऊ लागल्याबरोबर तिची समुद्राचे पृष्ठभागावर जितकी उष्णता असते, तिजपेक्षा कमी उष्णता जमिनीवर लागल्यामुळे, तसेच तिज-

-----

 * हवेतील रजःकण व विद्युत् ही पाऊस पडण्यास कांहीं अंशी कारणीभूत होतात म्हणून अलीकडे समजले आहे. परंतु ह्या गोष्टीचे ज्ञान अद्यापि अपुरे आहे.