पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६२

रहात नाहीं. जर जोरानेच घालू लागले, तर त्या वाफेचे पाणी होते; व ते आंतले बाजूने शामदानाचे पृष्ठभागावर दंवासारखे स्पष्ट दिसू लागते. नंतर त्या शामदानास उष्णता लावून आतील हवेची उष्णता वाढवावी. म्हणजे त्याच हवेमध्ये अधिक वाफ राहूं शकते. आणि जास्त वाफ घालण्याचा क्रम तसाच चालू ठेविला असतां, कांहीं वेळाने तिलाही विरण्याची परमावधीची स्थिति प्राप्त होते. नंतर तिजमध्ये जास्त वाफ राहू शकत नाहीं. जास्त वाफ घातल्यास तिचे पाणी होते. अशीच गोष्ट आणखी हवेची उष्णता वाढविली असतां होते.

 आतां, अशा रीतीने हवेची उष्णता २१२° फा० वर आणून तीस विरण्याच्या परमावधीची स्थिति प्राप्त केली असे समजा. नंतर त्या हवेची उष्णता कमी करू लागलो तर काय होईल? जास्त उष्णता केल्यामुळे जितकी जास्त वाफ त्या हवेमध्ये राहिली होती, तितकी वाफ जलरूपाने नळीच्या बाजूवर दंवासारखी दिसू लागेल. कारण, हवेचा धर्म असा आहे की, तिजमध्ये नियमित उष्णता असल्या वेळीं नियमितच वाफ राहू शकते, जास्त राहू शकत नाहीं; म्हणून जास्त असलेल्या वाफेचे पाणी झालेच पाहिजे.

 आतां, असे समजा कीं, कांहीं एक उष्णतेच्या हवेमध्ये थोडीशी वाफ आहे; परंतु तितक्या उष्ण हवेस विरण्याच्या परमावधीच्या स्थितीस आणण्याइतकी नाहीं. असल्या हवेची उष्णता कमी करूं लागलों, तर काय होईल ? उष्णता कमी करूं लागल्याबरो-