पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५३

मोठ्या होणे. लंब किरणांपासून उष्णता जास्त प्राप्त होते हैं वर दाखविलेच आहे. उन्हाळ्यामध्ये रात्रीपेक्षा दिवस मोठे असतात; ह्यामुळे दिवसा जितकी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते, तितकी रात्रीं परावर्तन पावून नाहीशी होत नाहीं; ह्यामुळे दिवसानुदिवस गरमा जास्त भासतो. ह्याचे उलट, हिंवाळ्यामध्ये रात्री मोठ्या असल्याकारणाने दिवसा जितकी उष्णता प्राप्त होते त्यापेक्षा जास्त उष्णता रात्री परावर्तन पावून नाहींशी होते; म्हणून उत्तरोत्तर थंडी जास्त जास्त पडू लागते. हीच कार्ये उन्हाळा व हिंवाळा होण्यास कारणीभूत आहेत, हे उघड झाले.

 अशा रीतीने पृथ्वीवर होणारे खरे ऋतु म्हटले म्हणजे दोन : एक उन्हाळा व दुसरा हिंवाळा. आतां, निरनिराळ्या ऋतूंचे परिणाम हवेवर काय होतात ते पाहूं.

नियतकालिक वारे.

 उष्णतेचे हवेवर मुख्य कार्य म्हणजे वारे उत्पन्न होणे हे होय. एथें, वारा म्हणजे काय हे सांगितले पाहिजे. पृथ्वीभोवती वायूचे वेष्टण आहे त्यास वातावरण म्हणतात. हे वातावरण स्थिर असलें म्हणजे आपणांस भासत नाही. परंतु त्यास गति प्राप्त झाली असता, ते वाऱ्याच्या रूपाने आपणांस भासमान होते. तर अशी गति उत्पन्न होण्यास अगर वारे उत्पन्न होण्यास कारण काय होते ? पदार्थांचे अंगीं असा एक गुण आहे की, त्यांस उष्णता लाविली असतां ते प्रसरण पावतात म्हणजे फुगतात. वायुरूप पदार्थ तर थोड्या उष्णतेने फारच फुगतात. फुगलेला पदार्थ व मूळ पदार्थ