पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/65

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५२

म्हणतात. ह्याच्या अगदी दक्षिणेस मकर रास आहे, व अगदी उत्तरेस कर्करास आहे. ह्या राशींवरून त्या त्या वृत्तास त्यांची नावे पडली आहेत.

 अयनें:- ही जी सूर्याची दृश्य गति हिलाच दक्षिणायन व उत्तरायण म्हणतात. कर्कवृत्ताचे दक्षिणेस मकरवृत्ताकडे सूर्य जाऊं लागला म्हणजे त्यास दक्षिणायन म्हणतात; व मकरवृत्ताचे उत्तरेस कर्कवृत्ताकडे येऊ लागला म्हणजे त्यास उत्तरायण म्हणतात. दक्षिणायनाचे तीन महिने लोटल्यावर आपणांकडे थंडी सुरू होत, व उत्तरायण लागण्याचे वेळीं थंडीचा ऐन मध्य असतो. ह्याचप्रमाणे उत्तरायण अर्धे संपलें म्हणजे उन्हाळ्यास सुरुवात होते, व दक्षिणायन लागण्याचे वेळीं ऐन उन्हाळा असतो.

 आतां, वास्तविक म्हटलें म्हणजे सूर्य कांहीं फिरत नाहीं, तो स्थिर आहे; पृथ्वी मात्र फिरते. असे असतां अयने होण्याचे कारण काय ? तर ह्याचे कारण इतकेच कीं, पृथ्वीचे आंसाचा तिचे कक्षेशी काटकोन झाला नसून ६६/ ° अंशांचा कोन झाला आहे. त्यामुळे सहा महिनेपर्यंत उत्तरध्रुव सूर्याकडे कललेला असतो व सहा महिनेपर्यंत दक्षिणध्रुव सूर्याकडे कललेला असतो. दक्षिणध्रुव कललेला असतो त्या वेळीं दक्षिणेस सूर्याची किरणें लंब पडतात व उत्तरेस तिर्कस पडतात, ह्याच वेळीं दक्षिणायन असते. ह्याच्या उलट उत्तरध्रुव सूर्याकडे कललेला असतो, त्या वेळीं उत्तरायण असते.

 ह्या अयन गतींची दोन कार्ये होतातः पहिले, सूर्याची किरणें निरनिराळे ठिकाणीं लंब पडणे. व दुसरे, दिवस व रात्री लहान