पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४७

प्राप्त होते हे उघड आहे. परंतु सूर्य व पृथ्वी जर कायम आहेत तर उष्णता कमी जास्त कां होते ?

 बुध, शुक्र, मंगळ, व गुरु वगैरे ग्रहांप्रमाणे पृथ्वी हा एक ग्रह आहे. सर्व ग्रह सूर्यासभोवती फिरत असतात; व त्यांस एक प्रदक्षिणा करण्यास नियमित काळ लागतो. ह्या सर्व ग्रहांच्या फिरण्याच्या कक्षा सूर्यापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत. परंतु ह्या सर्वांच्या केंद्रस्थानीं सूर्य आहे. वास्तविक म्हटले असतां ह्या कक्षा वर्तुलाकार नाहींत, दीर्घवर्तुलाकार आहेत. दीर्घवर्तुलास दोन केंद्रे असतात, व त्याची आकृति बाजूस दाखविल्याप्रमाणे असते

त्या दोन केंद्रस्थानापैकीं एका केंद्रस्थानी सूर्य असतो. ग्रहांच्या कक्षा अशा असल्यामुळे ते आपआपले कक्षांमधून फिरावयास लागले असतां, काही दिवस सूर्यापासून दूर जातात, व कांहीं दिवस जवळ येतात. सूर्याजवळ आल्या वेळी सूर्याचे आकारमान वाढलेले दिसते, व त्यापासून थोडीशी उष्णताही अ-