पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४४

इतकी नाहीशी होते कीं, थोड्याच वेळांत अवशेष पाणी थिजून त्याचें बर्फ होते.

 वरील उदाहरणावरून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले म्हणजे पुष्कळ थंडी उत्पन्न होते हें अगदीं उघड आहे. व झाडांच्या पानांपासून नेहमी वाफ निघत असते म्हणून झाडे बाष्पीभवनाने पुष्कळ थंडी उत्पन्न करितात हे सिद्ध झाले. मि० चार्लस बेन्सन मद्रास सैदापेठ फार्मचे सुपरिंटेंडंट हे म्हणतातः इंग्लंडांत असा अदमास केला आहे की, झाडाचा एक रत्तल जडांश म्हणजे लाकूड उत्पन्न होण्यास २०० रत्तल पाणी त्या झाडांतून अभिसरण पावून त्याचे बाष्परूपाने विसर्जन व्हावे लागते. तसेच, एक -रत्तल क्षारांश ( राख ) उत्पन्न होण्यास २००० रत्तल पाणी झाडांतून फिरावे लागते. ह्यावरून झाडे बाप्पीभवनाने किती थंडी उत्पन्न करितात याचे अनुमान करितां येईल.

 आपल्या देशाची पहिली अवश्यकता जी थंडी ती, झाडे आपल्या काळ्या रंगानें, कार्बनिक आसिड वायूचे पृथक्करण करणे ह्या रसायन व्यापाराने, व पानांच्या द्वारे बाष्पीभवन करणे ह्या तीन रीतींनी उत्पन्न करितात, हे वर स्पष्टपणे दाखविले आहे. परंतु हे लक्षात ठेविले पाहिजे की, एक साधारण मोठे झाड वरील तिन्ही रीतांनी मिळून जरी बरीच थंडी उत्पन्न करिते, तरी आपुल्या ह्या अफाट उष्ण देशामध्ये सूर्यापासून जी उष्णता येते तिच्याशी तुलना केली असतां ती सागरामध्ये जसा जलबिंदु त्याप्रमाणे आहे. ह्याकरिता आपल्या ह्या देशामध्ये एथे कांहीं तेथे कांहीं अशी झाडे