पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१

गोचर होत नाहीं, तरी पाहिजे असल्यास ती उष्णता वाफेपासून आपणांस पुनः उत्पन्न करितां येते. एका भांड्यामध्ये पांच पंचपात्र्या पाणी घ्यावे व त्या भांड्यामध्ये रबराचे नळीने दुसऱ्या भांड्यांतून वाफ आणून सोडावी. पाणी बर्फाइतके थंड म्हणजे ३२° फा० असावे; व वाफ २१२° फा० उष्णतेची असावी. रबराचे नळींतून वाफ पाण्यात मिसळून तिचेही पाणी होईल, व त्या पाण्याची उष्णता वाढू लागेल. क्रमाक्रमानें भांड्यांतील पाण्याची उष्णता २१२° फा० वाढेल. व इतकी उष्णता वाढल्यावर मग वाफेचे थिजून पाणी न होता ती तशीच निघून जाऊं लागेल. इतके झाल्यावर पूर्वीचें पांच पंचपात्र्या पाणी होते ते मोजून पहावे. आतां असे आढळून येईल की, पूर्वी जे पांच पंचपात्र्या पाणी होते तें हल्ली सहा पंचपात्र्या झाले आहे, म्हणजे एक पंचपात्र पाणी वाढले आहे. हे वाढलेले पाणी कोठून आलें ? वाफ थिजून हे पाणी उत्पन्न झाले. परंतु एकच पंचपात्रभर ( बाष्परूपी ) पाण्याने पांच पंचपात्र्या पाण्याची उष्णता ३२° पासून २१२ पर्यंत वाढविली. परंतु त्या वाफेची उष्णता २१२° पेक्षा जास्त नव्हती. म्हणून एक पंचपात्रीभर पाणी होण्यापुरत्या वाफेमध्ये पांच पंचपात्री थंड पाणी आधण आणण्यास पुरे इतकी उष्णता अदृश्य रूपाने होती. ह्यावरून पाण्याची वाफ होतांना ते अतिशय उष्णता अदृश्य करिते हे उघड झाले.*

-----

 *वर सांगितलेल्या प्रयोगाप्रमाणेच स्थिति दारूच्या भट्यांमध्ये ( डिं- स्टिलरीमध्यें ) होत असते. चुलीवर जो हंडा असतो, त्यामधून दारूची