पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४०

तात. बाष्पीभवन करण्यास उष्णता अवश्य आहे. चुलीवर एका भांड्यांत पाणी ठेवून त्याची सर्व वाफ करावयाची झाल्यास चुलीखालीं लाकडे लाविली पाहिजेत. पाण्याची वाफ होण्यास जितकी उष्णता अवश्य पाहिजे असे आपणांस सकृद्दर्शनीं वाटते त्यापेक्षा पुष्कळ जास्त उष्णता त्यास लागते. पाण्यास आधण आले म्हणजे झाले, मग ते पाणी न निवू देण्याइतकी उप्णता त्या पाण्यास दिली, तर सर्व पाण्याची वाफ होईल, असे आपणांस साधारणपणे वाटते परंतु तशी गोष्ट नाही. पाण्यास आधण येण्यास, त्या पाण्याची उष्णता समुद्राचे सपाटीवर २१२° फा० असली पाहिजे. आतां, एक भांडेभर पाण्यास आधण आणण्यास जितकी उष्णता लागते, तिच्या ५/ पट उप्णता त्या पाण्याची वाफ करण्यास लागते. एका भांड्यामध्ये पाणी घालून ते चुलीवर ठेवावे, व त्यास आधण आणण्यास किती सर्पण लावावे लागते ते पहावे. नंतर, पुढे त्या सर्व पाण्याची वाफ होण्यास आणखी किती सर्पण लावावे लागते ते पहावें. आणखी सुमारे ५ पट अधिक सर्पण लाविल्याशिवाय त्या पाण्याची सर्व वाफ होऊन जाणार नाही. पण पाण्यास आधण आल्या वेळीं, जी त्याची उष्णता असते, तितकीच त्या वाफेची उष्णता असते, म्हणजे:२१२° फा० असते. तर मग, वर सांगितलेली पांचपट उष्णता जाते कोठे ? नाहीशी होते की काय ? उष्णता नाहींशी कधीं होत नसते; उष्णतेचे रूपांतर होते, परंतु ती कधीही नाहीशी होत नाही. प्रकृत उदाहरणामध्ये ती वाफेमध्ये गुप्त रूपाने असते, म्हणजे ती वाफेमध्ये आहे म्हणून जरी आपल्या इंद्रियांस