पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३९

वेळाने झाडांच्या पानांवर ऑक्सिजन वायूचे बुडबुडे दिसू लागतात. हे पात्र कांहीं वेळ उन्हांत तसेच राहू दिले असतां बराच ऑक्सिजन वायु त्या पात्राचे वरचे बाजूस जमतो.

 आतां, हा ऑक्सिजनवायुच आहे किंवा दुसरा कोणता वायु आहे याची परीक्षा करणे झाल्यास एकादी बारीक लाकडाची धलपी विस्तव असलेली घेऊन त्या वायूमध्यें धरावी म्हणजे एकदम पेट घेईल, व फारच सतेज जळू लागेल. ऑक्सिजन वायूमध्ये ज्वालाग्राही पदार्थ फारच सतेज जळतात. म्हणून उत्पन्न झालेला वायु ऑक्सिजनच आहे हे उघड झाले. वर सांगितलेले पात्र जर अंधारामध्ये नेऊन ठेविलें, तर कार्बनिक आसिड वायूचे पृथक्करण बिलकूल होत नाहीं. ह्या पृथक्करणास उष्णता पाहिजे, व ती झाडे उजेडांत असतांना नेहमी हवेमधून घेतात. अर्थातच मग हवेमध्ये थंडी उत्पन्न होते.*

बाष्पीभवन

 आतां, बाप्पीभवनाने थंडी कशी उत्पन्न होते, ह्याविषयी विचार करणे राहिले. झाडे पाणी जमिनीतून शोषून घेऊन त्याचे पानांच्या पृष्ठभागाच्या द्वारे हवेमध्ये नेहमी बाप्पीभवन करीत अस-

-----

 *झाडे कार्बानिक आसिड वायूचे पृथक्करणास जी उष्णता घेतात, ती अगदीं नाहींशी होते असे नाही. ती झाडांमध्ये अदृश्यरूपाने असते व आपणांस पाहिजे तेव्हां पुनः ती उत्पन्न करितां येते. लाकडे अगर कोळसे जाळले असतां जी उष्णता उत्पन्न होते ती झाडांचे पोषण होऊन लाकूड बनण्यामध्ये अदृश्य झालेली उष्णता होय.