पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३८

 बाजूस लिहिलेल्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे अ एक मोठ्या

तोंडाची बाटली घ्यावी, व तींत चॉकाचे तुकडे व पाणी घालून ठेवावें; तोंडामध्ये एका बाजूस फनेल चांगले घट्ट बसवून त्याचे एक शेवट पाण्यामध्ये बुडेल असे करावे; दुसऱ्या बाजूला एक रबराची नळी बसवावी; क हे एक लाकडाचे अगर धातूचे पात्र घेऊन त्यांत पाणी भरावे; ब हे एक हंडीसारखे काचेचे पात्र घेऊन तेही पाण्याने भरावें, व त्याचे तोंड पाण्यांत असतांच उपडे करून तोंड पाण्यांत बुडे अशा रीतीने त्या पात्रांत ठेवावे, म्हणजे बाहेरील हवेच्या दाबाने पाणी त्या हंडीमध्ये वर राहील. फनेलांतून आसिड ओतू लागले म्हणजे वायु उत्पन्न होऊन नळीवाटे हंडीत शिरेल, व हंडींतील पाण्यात विरेल. जास्त वायु विरेनासा झाला म्हणजे नळी काढून घ्यावी व त्या हंडीमध्ये कांहीं हिरव्या पानांची लहान लहान झाडे घालून ती हंडी बुडाच्या पात्रासह उन्हामध्ये ठेवावी. उन्हाच्या उष्णतेच्या योगाने झाडे त्या वायूचे ( ग्यासाचे ) पृथ- करण करूं लागून कार्बन आपले पोषणास घेऊन ऑक्सिजन वायु निराळा करितात. हे पात्र उन्हांत ठेविलें म्हणजे थोड्याच