पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४

काय तो मुख्यत्वेकरून हिंदुस्तानांतून व अमेरिकेंतून होतो. अमेरिकेंत लढाई चालली होती त्यामुळे तिकडून इंग्लंडास कापूस जाण्याचे बंद पडले व एकंदर कापूस हिंदुस्तानांतून न्यावा लागला. ह्यामुळे कापसास इतकी तेजी आली कीं, जो तो आपल्या जमिनीमध्ये धान्य पिकवावयाचे सोडून देऊन कापूस पिकवू लागला; अर्थातच धान्य कमी पिकू लागून महर्गता झाली. पाऊस पडूनही महागाई झाल्याचे हे एक उदाहरण सांपडेल. हिंदुस्तानचे नशीब उघडून दर वर्षी कापसास अशीच तेजी येत गेली असती, तर पुढे धान्य महाग झाले नसते; लोकांजवळ पैसा पुष्कळ होऊन इतर देशांतून धान्य आणविण्यास अडचणं पडली नसती; व व्यापारास उत्तेजन मिळून इतर देशचे लोकही इकडे धान्य घेऊन येऊ लागले असते; परंतु ही स्थिति अपवादक होय. पाऊस चांगला पडला म्हणजे दुष्काळ पडण्याची भीति मुळीच नाहीं, ही नेहमींची साधारण स्थिति. मुख्यतः पाऊस पुरेसा पडला पाहिजे. म्हणून जे उपाय पाऊस पडण्यास साधनीभूत होतील ते उपाय योजण्याविषयी आपण सतत झटले पाहिजे.

पाण्याचा संचय.

 आतां, तिसरी अवश्यकता जी पाण्याचा संचय तिजबद्दल विचार करूं. वर सांगितलेच आहे कीं, उष्ण देशामध्ये पाऊस नियमित काळीं मात्र पडतो. आपल्या इकडे वर्षातून चार पांच महिने पाऊस पडतो; बाकीच्या दिवसांत पावसाचा थेंब सुद्धां सहसा