पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८

पायकारक होते. उष्ण हवेतील लोकांचे आयुष्यही कमी होते. कारण, एथे, मनुष्यास प्रौढत्व लौकर प्राप्त होते व वार्धक्यही लौकर येते. उष्ण देशामधील मुली १०।१२ वर्षांच्या वयाच्या झाल्या असतां प्रौढ दशेस येतात, व अल्पवयी पुरुषांची लग्ने करण्याची चाल असल्यामुळे संतति सशक्त होण्याचा संभव कमी असतो. फ्रान्स, इंग्लंड वगैरे थंड देशांतील लोकांमध्ये बायका सरासरी २० वर्षांच्या वयाच्या होत तों, व पुरुष सरासरी २२ वर्षांचे वयाचे होत तों प्रौढ दशेस येत नाहींत. आपल्या सुद्धा देशांत उत्तर हिंदुस्तानापेक्षां मद्रासेकडे जास्त उष्णता असल्यामुळे तिकडील बायकांस प्रौढत्व लौकर प्राप्त होते. उत्तर हिंदुस्तानांत थंडी विशेष असल्यामुळे तिकडील बायका १५ अगर १६ वर्षांच्या वयाच्या होत तों प्रौढ होत नाहींत. ह्याचप्रमाणे मानसिक वाढीचीही गोष्ट आहे. आफ्रिकाखंडामधून विषुववृत्त जाते, म्हणून तेथील हवा फार उष्ण असल्याकारणाने लोक खुजट, काळे, कुरूप व अगदी रानटी स्थितीत असलेले आढळतात; त्या खंडांत कांहीच सुधारणा झालेली आढळत नाहीं; लोकांच्या मानसिक शक्ती- मध्येही सुधारणा नाहीं. तीच फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, युनायटेड- स्टेट्स वगैरे समशीतोष्ण कटिबंधाचे देशांतील लोकांची स्थिति पहा; तेथील लोक अंगाने सशक्त, उंच, सुस्वरूप असे आढळतात. ह्या देशांमध्ये हरएक प्रकारची सुधारणा शिखरास जाऊन पोहोंचली आहे. लोकांची मानसिक शक्तिही अतिशय वृद्धिंगत झाली आहे. फार लांब कशाला ? आपला हा हिंदुस्तान देशच पहा, वर