पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३

 कर्कवृत्त हें उष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंध यांची सीमा आहे. हे वृत्त हिंदुस्तानचे पश्चिमेस सिंधुनदाच्या मुखाच्या दक्षिणेकडून येऊन कच्छ प्रांतांतून गुजराथेमध्ये अहमदाबादेच्या उत्तरेकडून जाऊन, माळव्यामध्ये उजनीच्या उत्तरेकडून जाते. पुढे बहार प्रांतांतून बंगाल प्रांतामध्ये बरद्वान, डाका ह्यांच्या उत्तरेकडून जाऊन ब्रह्मदेशाकडे जाते. ह्या वृत्ताच्या उत्तरेस सूर्य कधीही थेट डोक्यावर येत नाहीं. उत्तरायणामध्येसुद्धा सूर्य दक्षिणेचेच बाजूस असतो. तशी गोष्ट वरील वृत्ताचे दक्षिण बाजूस नाहीं. इकडे वर्षातून दोन वेळां सूर्य थेट डोक्यावर येतो. म्हणजे ज्या वेळीं सूर्य दक्षिणेकडून येऊन उत्तरेकडे जाऊ लागतो त्या वेळी एकदां, व पुनः जेव्हां उत्तरेकडून परतून पुनः दक्षिणेकडे जाऊ लागतो त्या वेळीं एकदां. ह्यास प्रत्यंतर कीं, कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील लोकांस उत्तरायणामध्ये झाडे, घरे वगैरेची सावली दक्षिणेकडे पडलेली दिसते. व दक्षिणायनामध्ये उत्तरेकडे पडलेली दिसते. तशी स्थिति कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील लोकांना होत नाहीं. तिकडे सावली नेहमीं उत्तरेकडे पडलेली दिसते.

 उष्ण कटिबंधांत सरासरी वार्षिक उष्णतेचे मान ७३° पासून ८२ पर्यंत असते. व पुढे अक्षांश ३६ पर्यंत सरासरी ६२° पासून ७१° पर्यंत असते. वर सरासरी वार्षिक उष्णतेचे मान सांगितले. परंतु, सरासरी उष्णतेचे मान सांगितल्याने तेथील उन्हाळ्याचे कडकपणाची कल्पना नेहमीं करितां येते असे नाहीं. आतां उन्हाळ्यामध्ये जे उष्णतेचे मान असते, त्यापेक्षां हिंवाळ्या-