पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२

पेक्षा अधिक उंच असल्यामुळे हा भाग पश्चिमेस अधिक उंच असून पूर्वेस उतरता होत गेला आहे. ह्या कारणाने सर्व मोठमोठ्या नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी व महानदी ह्या पश्चिमेस उगम पावून पूर्वेकडे वाहात जातात. ह्या प्रदेशाच्या नैर्ऋत्येकडचा भाग मराठ्यांच्या राज्याचे मुख्य स्थान होते. हा भाग अतिशय जरी डोंगराळ नाहीं तरी खोल खोल दऱ्यानी व्यापला आहे. मध्यभाग म्हणजे गोवळकोंडे, विजापूर वगैरे प्रांत हीं बरीच सपाट मैदाने आहेत; व समुद्राचे पृष्ठभागापासून हा प्रांत बराच उंच असल्या- मुळे घाटाखाली सूर्याचे प्रखरतेपासून जितका त्रास होतो, तितका एथे होत नाहीं. जमीन सपाट असून सुपीक आहे. अगदी दक्षिणे- कडचा प्रांत ज्याला कर्नाटक असे म्हणतात त्यामध्ये दोन पठारें आहेतः एक म्हैसूर व दुसरें बालेघाट. ही दोन्ही पठारें मूळच्या उच्च भागावर आणखी बरीच उंच आहेत. ह्यांपैकी म्हैसूर प्रांत सुमारे ३००० फूट उंच आहे, म्हणून दक्षिणचे पठारावर निर- निराळ्या प्रकारची हवा, जमिनी व पिके आढळतात.

हवामान

 ह्याप्रमाणे स्वाभाविक रचनेचे वर्णन झाले. आतां ह्या देशाची हवा कशी आहे ते पाहूं. आरंभीं सांगितलेच आहे की, हिंदु- स्तानदेश हा विषुववृत्ताचे उत्तरेस ८° पासून ३६° पर्यंत आहे. व कर्कवृत्त हे विषुववृत्ताच्या उत्तरेस २३/ ° वर आहे. म्हणजे हिंदु- स्तानदेश अर्धा उष्ण कटिबंधांत व अर्धा समशीतोष्ण कटिबंधांत आहे, असे म्हटले तरी चालेल.