पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११

हे ८७०० फूट उंच आहे. रायल साहेबांचे मताप्रमाणे दोन्ही घाटांस जोडून टाकणारी ही रांग होय. व एथून फक्त एकच फांटा दक्षिणेकडे कन्याकुमारी केपापर्यंत गेला आहे. पश्चिमकिनारा बहुतकरून फार सखल आहे, व किनाऱ्याशीं समांतर अशा बहुत नद्या वाहतात.

 पूर्वेकडील घाट हे कारोमांडल किनाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूस म्हणजे पश्चिमेस आहेत व साधारणपणे सह्याद्रीइतके उंच नाहींत. तथापि, त्यांस असंख्य शाखा फुटल्या आहेत. समुद्र व डोंगर ह्यांमधील अंतरही जास्त आहे. पश्चिम घाटापासून निघून बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या महानद्यांचा *अंतर्वेदीचा प्रदेश खेरीजकरून बाकीचा भाग रुक्ष व नापीक आहे. कांहीं कांहीं ठिकाणी तर लवणमिश्र वाळूच्या जमिनी आहेत. थोडेसे उत्तरेकडे म्हणजे ओरिसा आणि सरकार ह्या प्रांतांमध्ये उंचवट्याचा प्रदेश अगदी समुद्रास जाऊन मिळाला आहे. व तो बहुतेक लागण नसून डोंगराळ व जंगलयुक्त असा आहे. हिंदुस्तानचे इतर भागांतील लोकांपेक्षा एथील लोक अगदीं रानटी आहेत. ह्याच्याच पुढे गंगा नदीच्या जवळचा कटक प्रांत इतका सखल आहे कीं, एथे समुद्राचे पाणी शिरून तो प्रदेश बुडून जाण्याची नेहमीं भीति असते.

 वर सांगितलेल्या डोंगराच्या रांगांनीं वेढिलेलालेला उच्च प्रदेश हाच दक्षिण हिंदुस्तानचा मुख्य भाग होय. हे एक विस्तीर्ण पठार असून ह्याची सरासरी उंची १५०० फुट आहे. पश्चिमघाट पूर्वघाटा-

-----

 * अंतर्वेदी म्हणजे एका नदीच्या दोन फांट्यांमधील प्रदेश.