पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०

ह्या द्वीपकल्पाचे समोरासमोरचे मलबार व कारोमांडल किनारा ह्यांस बहुतांशीं माळ घातल्याप्रमाणेच आहेत की काय असे दिसते. पश्चिमघाट ज्यास सह्याद्रि असे म्हणतात ही पर्वताची रांग अरबी समुद्राचे किनाऱ्याशी समांतर व किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर पसरली आहे. व कांहीं कांहीं ठिकाणी तर अगदी समुद्रास येऊन भिडली आहे. समुद्रापासून पर्वताचे सरासरी अंतर ३० पासून ५० मैलपर्यंत आहे. ह्या पर्वताचे शिखरांवर हिमालय पर्वताचे शिखरांप्रमाणे समशीतोष्ण देशांतील व शीत देशांतील वनस्पति नसून उष्ण देशांतील सुंदर व भव्य ताडमाडांची झाडे व कांहीं सुवासिक झाडे म्हणजे चंदन, मिरी, सुपारी, साबू , व नारळ हीं आढळतात. सर्वांत इमारतीच्या उपयोगी श्रेष्ठ अशीं सागवानाचीं झाडे ह्या पर्वतावर होतात. उत्तरेकडच्या बाजूस ह्या पर्वताची उंची ३००० फुटांहून जास्त नाहीं. साताऱ्याजवळ महाबळेश्वर म्हणून एक शिखर ५००० फूट उंच आहे, व रोगी मनुष्यास हे आरोग्यस्थान आहे. परंतु, ह्या पर्वताची अतिशय उंच शिखरें अक्षांश १५ चे दक्षिणेस मलबार व कानडा ह्यांच्या किनाऱ्यावर आहेत. त्या ठिकाणीं कांहीं कांहीं *ग्रानाइटचीं शिखरे ६००० फूटपर्यंत उंचीची आहेत. म्हैसूरच्या सरहद्दीवर ह्या पर्वतापासून एक आडवी रांग पूर्वपश्चिम गेली आहे; हीस निलगिरी असे म्हणतात. हा पर्वत दक्षिणेमध्ये सर्वात उंच आहे. ह्याचे एक शिखर दोदाबेटा

-----

 *ग्रानाईट हा एक प्रकारचा धोंडा आहे. हा गार, अभ्रक, व हार्नब्लेंड ह्या तीन खनिज पदार्थाच्या कणांच्या मिश्रणापासून झालेला असतो.