पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
उत्तर सीमा जो हिमालयपर्वत त्यासारखी नाहीं. लहान लहान

टेकड्या व कांहीं कांहीं ठिकाणी डोंगर ह्या प्रदेशाच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी पसरले आहेत. व ह्यांमध्ये लहान मोठी पुष्कळ पठारें आहेत. अशा तऱ्हेने जमीन समुद्राचे पृष्ठभागापासून बरीच उंच असल्यामुळे उष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंध ह्या दोहों ठिकाणची हवा व वनस्पति ह्या ठिकाणी आढळतात. परंतु विशेष लक्षात ठेवण्यासारखी रचना म्हटली म्हणजे ह्या द्वीपकल्पास समांतर त्रिकोणाकार पर्वत आहेत ही होय. ह्या त्रिकोणाचा पाया म्हणजे उत्तरेकडचा भाग हा खंबायतच्या आखातापासून बंगालच्या उपसागरापर्यंत नर्मदा नदीचे दोन्ही कांठचा उंच डोंगराळ प्रदेश होय. ह्याच प्रदेशांत माळवा व खानदेश हे प्रांत आहेत. ह्या प्रांतांसच मध्य हिंदुस्तान ही संज्ञा देतात. वरील डोंगराळ प्रदेशास विंध्य पर्वताची रांग म्हणतात. तथापि, हा पर्वत इतका पसरट असून इतक्या रुंद प्रदेशावर पसरलेला आहे व तो इतका ठेंगणा आहे कीं, तो डोंगराची एकसारखी रांग न दिसतां तुटक तुटक अशा साधारण पठाराप्रमाणे दिसतो. बहुतकरून ह्या डोंगराची

  • उंची २००० फुटांपेक्षा जास्त नाहीं. ह्या डोंगराच्या दोन्ही

शेवटांपासून दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यास समांतर अशा दोन पर्वतांच्या रांगा गेल्या आहेत, ह्यांस घाट अशी संज्ञा आहे. हे घाट

-----

 *पर्वत, डोंगर व पठार ह्यांच्या ज्या ज्या ठिकाणी उंच्या सांगितलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पृष्ठभागापासून आहेत असे समजावे.