पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बर्फाचे पाणी करण्यामध्ये अदृश्य होते. पदार्थाचे रूपांतर होऊ

लागले असतां पुष्कळ उष्णता नाहीशी होते असा पदार्थविज्ञान शास्त्राचा नियम आहे.

 हिमालय पर्वत चढून जाऊन उत्तरेकडे वळू लागले म्हणजे अगदीं निराळा देखावा दृष्टीस पडतो. त्या बाजूस तिबेट देश आहे. तो हिंदुस्तान देशाइतका खोल नाहीं, म्हणजे तो एक पठाराचा प्रदेश आहे. ह्या पर्वताच्या त्या पाखरास हिंदुस्तानांत पर्जन्यकाळ असतो त्या वेळी पाऊस पडत नाहीं; व बर्फही फार थोडे पडते. त्या बाजूस इकडच्याप्रमाणे झाडझाडोऱ्याची समृद्धि नाहीं.

 हिमालय पर्वताची हिंदुस्तानचे उत्तरेस भिंत बनून राहिली आहे; इतकेच नाही, तर तिजखेरीज त्या पर्वताच्या दोन्ही टोंकांपासून त्याच्या टेकड्यांचे फांटे दक्षिण दिशेकडे गेले आहेत. ईशान्येकडे जे फांटे गेले आहेत त्यांना नागपर्वत व पतकुईपर्वत अशी नावे आहेत. त्यांच्या योगाने हे स्वतःसिद्ध हिंदुस्तानची ईशान्य सीमा बनून राहिले आहेत. तसेच, हिंदुस्तानच्या वायव्येकडील डोंगरांचे फांटे ब्रिटिश सरकारचे सरहद्दीवर हिमालयापासून तो थेट समुद्रापर्यंत खाली आले आहेत. हे फांटे दक्षिणेकडे येत असतां अनुक्रमें सेफेडकोह, सुलैमानपर्वत व हालापर्वत ह्या नांवांनी प्रसिद्ध आहेत. ह्या पर्वतांच्या शिखरांची उंची ११००० फुटांहून जास्त आहे.

 दक्षिण:-दक्षिणेकडील द्वीपकल्प ह्यास दक्षिण ( डेक्कन ) असे म्हणतात. ह्याची रचना वर सांगितलेले मैदान व त्याची