पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सांगितलेल्या उत्तर हिंदुस्तानाच्या मैदानाच्या उत्तरेस ह्या मैदाना-

इतक्याच लांबीचा हिमालय पर्वत आहे. काल्डर साहेबांच्या मताप्रमाणे ह्या पर्वतसमूहामध्ये एक अविच्छिन्न एकसारखी १००० मैल लांबीची रांग आहे. समुद्राचे पृष्ठभागापासून ह्याची सरासरी उंची सुमारे २१००० फूट आहे. ह्या रांगेवर कांहीं कांहीं ठिकाणी कित्येक शिखरे आणखी ५०००-६००० फुटांपर्यंत उंच गेलेली आहेत. म्हणजे ह्या पर्वताची अतिशय उंची कांहीं कांहीं ठिकाणी समुद्राचे पृष्ठभागापासून २८०००-२९००० फूट म्हणजे ५ अगर ५/ मैल आहे. हा पर्वत जसजसा उंच होत गेला आहे, तसतशी त्यावरील हवेची उष्णता कमी कमी होत गेल्यामुळे, भूगोलावर उत्तरेकडे जाऊ लागले असतां ज्याप्रमाणे निरनिराळ्या वनस्पति व प्राणी आढळतात, त्याप्रमाणेच ह्या पर्वतावर स्थिति आहे.

 हिमालय पर्वतावरील वनस्पतिशास्त्राचे वर्णन करण्याकरिता रायल साहेबांनी त्याचे तीन पट्टे कल्पिले आहेत.

 पहिला पट्टा-हा ५००० फूट उंचीपर्यंत समजावयाचा. ह्या ठिकाणीं नियमाप्रमाणे उंचीच्या मानाने उष्णता कमी कमी होत गेलेली आहे. तथापि, उष्ण कटिबंधांतील वनस्पतींची जितका

-----

 *' कटिबंध' ह्याचा अर्थ " पृथ्वीवरील उष्णतेच्या मानावरून कल्पिलेला पट्टा " असा आहे. हवेच्या उष्णतेच्या मानाने पृथ्वीवर पांच पट्टे कल्पिले आहेत. पहिला पट्टा पृथ्वीच्या मध्यभागीं विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस २३/ अंशापर्यंत आहे. एथे उष्णता फार असते. ह्या कटिबंधास 'उष्ण कटिबंध ' असे म्हणतात. ह्या कटिबंधास लागून उत्तरेस