पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
दोन नद्यांमधील प्रांतास ' दोआब' असे म्हणतात. हा प्रांत

इतका सुपीक नाहीं; तरी ह्यामध्ये जंगल फार दाट आहे. यमुना नदीचे दक्षिण बाजूस तिचीच उपशाखा जी चंबळा नदी तिच्या प्रवाहाशी समांतर माळवा व अजमीर ह्या प्रांतांत ज्या डोंगरांच्या रांगा आहेत त्या लहान लहान टेकड्यांच्या बनलेल्या आहेत. दिल्लीच्या पश्चिमेस वाळूचे विस्तीर्ण मैदान लागते, व त्यानंतर पंजाब देश लागतो. ह्या देशामध्ये सिंधुनदास मिळणाच्या पांच नद्या असून पाण्याची समृद्धि पुष्कळ असल्यामुळे हा प्रदेश गंगा नदीच्या कांठच्या प्रदेशाच्या बरोबरीने सुपीक आहे.

 यमुना नदीच्या जवळच पश्चिमेस वर सांगितलेला सपाट प्रदेश थोडथोडा मध्यस्थानी उंच होऊन नंतर दोन्ही बाजूस उतरता होत गेला आहे. ह्या उच्च प्रदेशावर पडलेले पावसाचे पाणी पूर्वेकडे वाहात जाऊन गंगेस मिळते, व कांहीं पश्चिमेस वाहात जाऊन सिंधूस मिळते. ह्या दोन महानद्या व त्यांस मिळणाऱ्या नद्या ह्यांमध्ये एक विस्तीर्ण वाळूचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये थोडेसे लहान लहान पाण्याचे ओहोळ मात्र आहेत. ह्या ओहोळांचा उगम ह्याच मैदानांत होऊन त्यांचा लयही तेथेच होता. अशा प्रकारचे हे अरण्य हिमालय पर्वतापासून समुद्रापर्यंत पसरले आहे. ह्याची लांबी सुमारे ६०० मैल आहे व रुंदी सुमारे ३०० मैल आहे. अरबस्तानांतील किंवा आफ्रिका खंडांतील अरण्यासारखेच है एक अरण्य होय.

 हिमालय पर्वत:—हिंदुस्तानाच्या उत्तर सीमेवर म्हणजे वर