पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/144

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३१

लाविल्यापासून एक मात्र गैरफायदा आहे. तो असा की, कांठावर झाडे दाट असली तर त्यांचा पाला गळून पडून पाण्यांत कुजून ते खराब होते. ही गोष्ट खरी आहे, परंतु हे नासलेले पाणी पुढे मैदानांत बाहेर पडले म्हणजे हवेतील ऑक्सिजन वायु पाण्याशीं खेळून त्यांतील अपकारक सेंद्रिय द्रव्ये नाहींतशीं करतो. एकंदरीने पाहतां तोट्यापेक्षां नफेच फार आहेत. ह्याकरितां ह्या स्थळीं ही झाडे अवश्य लाविली पाहिजेत. नद्या, नाले यांच्या कांठीं जीं झाडे लावावयाची तीं सोटमुळ्यांची उपयोगी नाहींत. ज्यांच्या मुळ्या जाळ्याप्रमाणे जमिनींत पसरतात अशी झाडे चांगलीं. व अशीच झाडें अवश्य लावावीं.

 शेतांच्या सभोंवतीं — एथे झाडे लाविल्यापासून विशेष फायदा हाच की, झाडांच्या पानांपासून, फळांपासून वगैरे जे खत उत्पन्न होते ते जागच्या जागी उपयोगी पडते. दुसरी गोष्ट, त्या शेतांमध्ये रबीचीं पिके होत असल्यास त्यांस दहिंवरही जास्त मिळण्यास मार्ग होतो. तिसरें, शेतकऱ्यांंस व त्यांच्या गुरांस झाडांपासून आश्रय मिळतो. शेतासभोंवतीं झाडे दाट व कुंपणास उपयोग पडतील अशीं लाविली तर शेतास निराळे कुंपण लावावयाची जरुरी नाहीं. आणखी दर वर्षास कांहीं तरी उत्पन्न होईल, अशा प्रकारची झाडे लाविली असता त्यापासून नफाही आहे. मूल्यवान् फळांची झाडे अशा प्रकारचीं होत. उदाहरणार्थ, आंब्याची झाडे लाविलीं असतां प्रतिवर्षास फळांचे उत्पन्न होणार आहे.

 आतां, अशा रीतीने शेतासभोंवतीं झाडे लावण्यास लोकांची