पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१३०

लागवड करण्याचे सोडून तिच्यांत झाडे लावावी. व ज्या भागांवरील झाडें नाहींतशी झाली आहेत, त्यांजवर नवीन लावावीं. अशा ठिकाणी झाडे असल्यापासून कोणत्याही तऱ्हेचें नुकसान होत नाहीं; व नुकसान होते असा लोकांचा समज नाहीं हें एक बरे आहे.

 नद्या, नाले, ओहोळ, तळी, कालवे ह्यांच्या काठावर - ह्या ठिकाणी झाडे लाविल्यापासून विशेष फायदा हा की, झाडे आपल्या जालसदृश मुळ्यांनीं कांठची जमीन गच्च आवळून धरितात. त्यामुळे कांठची माती झिरपून जाऊन नुकसान होत नाही. हा झाडांचा उपयोग आपले लोकांस चांगला माहीत आहे. पाण्याचा प्रवाह एका बाजूसच वळला जाऊन नद्या, नाले यांस पूर आले म्हणजे प्रतिवर्षी एका कांठची जमीन झिरपून वाहून जाते. तशी ती न जावी म्हणून लोक त्या जमिनीच्या कडेवर झाडे लावीत असतात. इतकेच नव्हे, तर झाडे लावून कित्येक लोक नवीन जमीन उत्पन्न करितात. ओसी म्हणून एक झाड आहे. ते फार जलद वाढणारे असून पाण्यांत असले तरी वाढते. उन्हाळीं, नद्या, नाले यांमध्ये कांठापासून थोडे अंतरावर मातीमध्ये ही झाडे दाट पेरितात; व ती थोडक्याच कालांत इतकी गर्द होतात कीं, पावसाळ्यामध्यें पूर आला म्हणजे त्याबरोबर जो गाळ वाहून येतो तो ह्या झाडोऱ्याने अडकला जाऊन तेथेच पडतो. व ही जमीन प्रतिवर्षी वाढत जाते. ह्या योगाने कधी कधी पाण्याचा प्रवाह फिरला जाऊन पुढे नुकसान होण्याचे बंद होते. नद्यांचे कांठीं झाडे