पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११५

झाडांच्या वाढीस फारच उत्तम. व त्यांतही उष्ण देशांत ज्या ज्या ठिकाणीं हवा अतिशय सर्द असेल ती स्थळे अति उत्तम असतात. झाडे आपल्या पानांच्या द्वारे बाष्पीभवन करून हवेमध्ये नेहमी ओलावा उत्पन्न करीत असतात, व शिवाय झाडांच्या योगाने अनेक रीतीने पाण्याची वृद्धि होते. त्या पाण्याचे योगानेही हवेमध्ये ओलावा उत्पन्न होत असतो. अशा रीतीने झाडेच झाडांचे वृद्धीस कारणीभूत होतात. एवढे मात्र खरे आहे कीं, हवेमध्ये अतिशय ओलावा उत्पन्न झाला असला म्हणजे ती फारच सर्द होते. मग मात्र ती मनुष्यांचे प्रकृतीस हितावह होत नाहीं. ओलावा नियमित असला पाहिजे.

वाऱ्यास प्रतिबंध.

 वाऱ्यास अडथळा होणे, हा झाडांपासून आणखी एक फायदा आहे. एकाद्या ओल्या जमिनीवर स्तब्ध हवा असेल, तर त्या जमिनीपासून विशेष बाष्पीभवन होत नाही. कारण, बाष्पीभवन होऊन जी वाफ उत्पन्न होते ती जमिनीच्या पृष्ठभागाजवळ हवेमध्ये तशीच राहते. ह्यामुळे ती हवा आर्द्र होऊन तिजमध्ये बाष्पीभवन करण्याची शक्ति उत्तरोत्तर कमीकमी होत जाते. परंतु, अशा जमिनीवरून रुक्ष हवा वाहात राहील, तर बाष्पीभवनाने उत्पन्न झालेली वाफ वाऱ्याबरोबर वाहून जाऊन प्रत्येक वेळीं नवी रुक्ष हवा तिजवर येऊन बाष्पीभवन करीत जाईल. ह्या योगाने ती जमीन तेव्हांच वाळून जाईल. ह्याचप्रमाणे तळ्यांची स्थिति असते. जर त्यांवरून नेहमीं रुक्ष हवा वाहात राहील तर तीं लौकरच