पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१११

 ऑक्सिजन वायूच्या ह्या धर्मानें प्राण्याचे शरिरांतील रक्ताची शुद्धि नेहमी होत असते. आपल्या शरिरांतील रक्ताचे शुद्धीकरण करणे हा श्वासोच्छवास करण्याचा आपला उद्देश होय. प्रत्येक श्वास आंत घेण्याचे वेळी आपण जी हवा ओढून घेतों ती आपल्या फुप्फुसामध्यें जाते, व रक्ताभिसरणाने काळजामध्यें जें अशुद्ध काळे रक्त येते त्याबरोबर हवेतील ऑक्सिजन वायु रसायनरीत्या संयोग पावून ते रक्त शुद्ध करितो. व हे शुद्ध झालेले रक्त शरीरपोषणार्थ पुनः शरिरामध्यें जाते. रक्ताची शुद्धि करीत असतांना अशुद्ध रक्तातील कार्बन द्रव्याशीं ऑक्सिजन वायु संयोग पावून कार्बानिक आसिड वायु तयार होतो. आणि हा वायु आपण उच्छवासाचे वेळीं-म्हणजे श्वास बाहेर टाकण्याचे वेळीं-बाहेर टाकितो. ही रक्तशुद्धाची क्रिया आपल्या प्रत्येक श्वासोच्छवासाचे वेळीं चाललेली असते. म्हणून श्वासोच्छवास करण्यास आपणांस शुद्ध हवा पाहिजे आहे. शुद्ध हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, म्हणून अशा हवेनें रक्ताची शुद्धि चांगली होते. एकाद्या अगदी कोंडलेल्या खोलीमध्ये आपण पुष्कळ वेळ बसलो तर त्या खोलींतील हवेतला ऑक्सिजन वायु प्रत्येक श्वासोच्छासाचे वेळीं कमी कमी होत जाऊन कार्बनिक आसिड वायूचे प्रमाण वाढत जाईल. ह्या योगाने श्वासाबरोबर आपण जी हवा फुप्फुसांत वेतों तिजमध्ये ऑक्सिजन वायु फार थोडा राहील व रक्ताची शुद्धि चांगली होणार नाही. कार्बनिक आसिड वायूचे प्रमाण हवेमध्ये वाढत चालले