पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०८

कडबाकाडी व दाणा ह्या रूपाने आपण जी द्रव्ये जमिनींतून काढितो त्या योगाने जमीन दिवसानुदिवस अधिकाधिक निस्सत्त्व होत जाते. ह्याकरितां, जी कडबाकाडी निघते ती होईल तितकी कुजवून पुनः शेतास घालावी, असा कृषिकर्मशास्त्रांतील नियम आहे. परंतु, तसे केले तरी दाण्यांच्या द्वारा आपण जी पोषाक द्रव्ये काढून घेतों तीं उत्तरोत्तर जमिनीतून कमी झालीच पाहिजेत. व कडबाकाडी अशा रीतीने कुजवून शेतास घातली तर गुरास चाऱ्याची पंचाईत येऊन पडेल, म्हणून अशा थोड्याफार निस्सत्त्व झालेल्या जमिनीत पोषक द्रव्ये अधिक खोल जमिनीतून काढून घालणे झाडांवांचून इतर सुलभ रीतीनें करितां येत नाहीं. हा झाडांपासून शेतकीस मोठा फायदा आहे.

 खोल जमिनींतील पोषक द्रव्ये पानांच्या द्वारा वर आणून टाकणे ह्या धर्माने व झाडे आपल्या मुळ्यांच्या यांत्रिक शक्तीनें, जंगलांतील जमीन उत्तरोत्तर अधिक पोषक द्रव्यांनी युक्त करीत असतात, व मातीची उत्पत्ति करून ती वाढवीत असतात. ज्या डोंगरावर अगर खडकावर माती विशेष नाहीं, अशा जागेवर लहान लहान झाडे व गवत हीं पाहिल्याने लाविल्याने पाऊस व हवा ह्यांच्या व्यापाराने खडकाचे यांत्रिक पृथक्करण होऊन त्याचे बारीक बारीक कण सुटून जी माती तयार होते ती झाडे व गवत आपल्या मुळ्यांच्या योगाने बांधून ठेवितात. व झाडांची मुळे ही भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असतां, खडकाचे यांत्रिक पृथक्करण थोडे अंशी करीत असतात. अशा रीतीने मातीची वाढ होऊन ती जमीन मोठाल्या