पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९८

पडत नाहीं; कांहीं पदार्थावर मात्र दहिंवर पडते, व कांहींवर बिलकुल पडत नाही. यावरून उघड होते की, हिंवाळ्यामध्ये सुद्धां दहिंवर पडण्याइतके सर्वच पदार्थ निवून थंड होत नाहींत. कांहीं विशिष्ट पदार्थ मात्र इतके थंड होतात की, त्यांजवर दहिंवर पडते.

 आतां, ज्या पदार्थांवर दहिंवर पडते असे पदार्थ कोणते तें पाहूं. कित्येक पदार्थ उष्णतेचे वाहक असतात व कित्येक उष्णतेचे अवाहक असतात. तथापि, जे पदार्थ अवाहक आहेत त्यांमधून उष्णता बिलकुल जात नाहीं असें नाहीं. इतकेच की, ती फार सावकाश जाते. व जे उष्णतावाहक पदार्थ आहेत, त्या सर्वांमधूनही उष्णता सारख्याच त्वरेनें जाते असे नाहीं. काही पदार्थांमधून लौकर जाते, व कांहींमधून त्यांपेक्षां सावकाश जाते. म्हणून पदार्थांचे शीघ्रवाहक व मंदवाहक असे दोन भेद मानिले तरी हरकत नाहीं.

 आतां, ज्या पदार्थांमधून उष्णता लौकर जात नाहीं, ते लौकर तापतही नाहींत. लोकर, केंस, कापूस, लाकूड ही द्रव्ये अवाहक होत. म्हणून ह्यांस उष्णता लाविली असतां तीं लौकर तापत नाहींत. तसेच, सर्व धातु उष्णतेचे फार अवाहक आहेत. म्हणून त्यांस उष्णता लाविली असतां ते लौकर तापतात. लोखंडाच्या पळीचे एक टोंक चुलीमध्ये घातले असतां दुसरें शेवट लागलीच तापेल. परंतु चुलीमध्ये लाकडे जळत असतात, ती एका बाजूने जरी जळत असतात, तरी जळत्या भागापासून जवळच