पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९७

दिवस मोठा असल्यामुळे दिवसां जितकी उष्णता सूर्यापासून आपणांस मिळते, तितकी उष्णता परावर्तन पावून रात्रीं नाहींशी होत नाहीं; म्हणजे पृथ्वी अगर पृथ्वीवरील पदार्थ जे दिवसां तापतात, ते रात्रीं निवून फार थंड होत नाहींत. म्हणून उन्हाळा लागला म्हणजे दिवसानुदिवस उष्णता जास्तच होते, यास्तव दहिंवर पडत नाहीं. तथापि, उन्हाळ्यांतसुद्धां कृतीने आपणांस दहिंवर पाडतां येते. एक काचेचा प्याला बाहेरून अगदी कोरडा करून आंत बर्फ घालून हवेमध्ये क्षणभर ठेविला असतां त्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर पाण्याचे बिंदु उत्पन्न होतील. ह्याचे कारण हेच कीं, बर्फाचे योगाने काचेच्या प्याल्याची उष्णता इतकी कमी होते की, प्याल्याशीं संसर्ग झालेल्या हवेची विरण्याची परमावधीची स्थिति होऊन तींतील वाफेचे पाणी होते. परंतु, स्वाभाविकरीत्या उन्हाळ्यांत इतकी थंडी उत्पन्न होत नाही, म्हणून उन्हाळ्यांत दहिंवर पडत नाहीं.

 हिंवाळ्याची स्थिति अगदी निराळी आहे. म्हणजे ह्या दिवसांमध्ये सूर्यापासून उष्णता इतकी प्राप्त होत नसून दिवसापेक्षा रात्र मोठी असते. म्हणून दिवसां जी थोडीशी उष्णता प्राप्त होते, तिला परावर्तन पावून नाहींशी होण्यास पुष्कळ अवधि सांपडतो. म्हणजे पृथ्वी अगर पृथ्वीवरील पदार्थ जे दिवसां थोडेसे तापतात, त्यांस निवण्यास रात्री पुष्कळ वेळ मिळाल्यामुळे ते पुष्कळच थंड होतात. मग हिंवाळ्यामध्ये सर्वच पदार्थांशी संसर्ग झालेल्या हवेतील वाफेचे दहिंवर व्हावे, परंतु तशी स्थिति आपल्या दृष्टीस