पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९६

णजे विशिष्ट पदार्थ होत. ह्यावरून हे उघड होते की, दहिंवर पडण्यास वाफेची एकसहा विरण्याची परमावधीची स्थिति होण्याची जरूरी नाहीं; विवक्षित पदार्थांशी सँँल्लग्न असलेल्य हवेची तशी स्थिति झाली असतां पुरे आहे.

 चुलीवर कांहीं पदार्थ शिजतांना त्याजवर थंड भांडे झांकण घातले तर त्याचे बुडास जो घाम येतो, ते एक प्रकारचे दहिंवरच म्हणावयाचे. पदार्थ शिजतांना जी त्यांतून वाफ निघते ती वरील थंड भांड्यास लागून तिचे पाणी होते. तसेच दमट लाकडे चुलीमध्ये घालून वर पाणी तापविण्यास ठेविले असतां, आरंभीं भांड्याचे बुडापासून घामाचे थेंब पडून विस्तव अधिकाधिक विझतो, व त्या योगाने वरील भांडे गळते की काय असा संशय येतो, हेही एक प्रकारचे दहिंवरच म्हणावयाचे. दमट लाकडांतील ओलाव्याची वाफ होऊन ती वर जाते, व तिला थंड पाण्याचे भांड्याचा संसर्ग झाला म्हणजे तिचे पुनः पाणी होते. आरशावर अगर घासलेल्या चकचकीत भांड्यावर तोंडांतील वाफ टाकिली असता ती मंद दिसतात, याचेही कारण वर सांगितलेलेच होय.

 हिंवाळ्यामध्ये वाफेचा संचय नियमित असतो, म्हणून तिचे पाणी करणे झाल्यास थंडीचीच अवश्यकता आहे. स्वाभाविकपण इतकी थंडी प्राप्त होण्यास कांहीं ठिकाणे अगर पदार्थ यांतील उष्णतेचे परावर्तन होऊन ते आपोआप निवले पाहिजेत. ह्याशिवाय ही ठिकाणे व पदार्थ अधिक थंड होण्यास दुसरे साधन नाही. उन्हाळ्यामध्ये सूर्यापासून उष्णता जास्त प्राप्त होते, व रात्रीपेक्षांं