पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९५

कते. व विरण्याची परमावधीची स्थिती प्राप्त झालेल्या हवेला जास्त थंडी लागली असतां हवेमधील वाफेचे पाणी होते. पावसाळा संपल्यावर हवेमध्ये जी वाफ असते ती हवेची विरण्याची परमावधीची स्थिति करण्यास फारच कमती असते. उन्हाळ्यांत तर हवेतील उष्णता फारच जास्त असल्यामुळे हवेची तशी स्थिति होणे फारच दुरापास्त असते. मग थंडीच्या दिवसात तरी अशी स्थिति होते की काय ? थंडीच्या दिवसांतसुद्धा हवेची अशी स्थिति एकसहा क्वचितच होते. अशी स्थिति जर होईल तर मग थोडी जास्त थंडी पडली असतां पाऊसच पडेल. पण पावसाचे रूपाने हवेतील वाफेचे जे पाणी होते, त्यास आपण दहिंवर म्हणत नाहीं. तर मग पाऊस व दहिंवर यांत भेद काय ? विवक्षित स्थळीं बऱ्याच उंचीवरून एकसारखे जेव्हां पाण्याचे बिंदु खाली पडतात, तेव्हां त्यास आपण पाऊस म्हणतो. दहिंवर दोन तऱ्हेनें पडते. विवक्षित स्थळी हवेमध्ये वाफेचा संचय विशेष असून थंडी कडक पडली तर जमिनीशी सँँल्लग्न झालेली हवा कुंद होऊन वाफेचे दाट धुकें बनते व त्यामधून पाण्याचे फार बारीक तुषार मंद गतीने जमिनीवर पडतात, व विशिष्ट पदार्थांवर तर ते फारच पडतात. दुसरा प्रकार म्हणजे धुके बिलकुल नसतां, अगर असले तरी अगदी पातळ असून हवेमध्ये जलबिंदु न बनतां विवक्षित पदार्थावर मात्र ते उत्पन्न होतात हा होय. दोन्ही प्रकारांत पाण्याचे बिंदु उंचीवरून न पडतां जमिनीशी सँँल्लग्न झालेल्या हवेंतून उत्पन्न होतात. दोहोंतही दंव पडण्याचे विशेष ठिकाण म्ह-