पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९४

अगर वायव्येकडील नियतकालिक वाऱ्याच्या योगाने समुद्रावरील वाफ येऊन पाऊस पडण्यास जशी कारणीभूत होते, तशी वाफ दहिंवर पडण्यास जरूर नसते. जमिनीतील ओलावा, नद्या, तळीं, विहिरी वगैरे यांचे सतत बाष्पीभवनाने जी वाफ हवेमध्ये सांचते ती दहिंवर पडण्यास बस होते. ह्या वाफेचे पुनः पाणी होणे म्हणजे दहिंवर पडणे होय. हवेतील वाफेचे पाणी, थंडीच्या योगानं कसे होते हे मागे पावसाची उपपत्ति सांगतेवेळी सांगितलेच आहे. हवेमध्ये जास्त ओलावा आणण्यास व थंडी उत्पन्न करण्यास झाडे कशी कारणीभूत होतात ह्याचेही प्रतिपादन मागे केलेच आहे. थंडीचे मान सारखे असतां हवेमध्ये जितकी जास्त वाफ असेल तितकें दहिंवर जास्त पडेल. तसंच वाफेचे मान सारखे असता जितकी थंडी जास्त पडेल तितकें दहिंवर जास्त पडेल. मग वाफेचे मान व थंडीचे मान ही दोन्ही जास्त असल्यावर दहिवर पुष्कळच पडेल हे सांगणे नको.

 झाडांपासून थंडी व वाफ उत्पन्न होऊन ती दहिंवर पडण्यास कांहीं अंशी कारणीभूत होतात, परंतु ह्यांशिवाय झाडांमध्ये तिसरा एक गुण आहे. त्याच्या योगाने दहिंवर पडण्यास फारच साहाय्य होते. तो गुण कोणता ते आतां पाहूं.

 उन्हाळ्यामध्ये दहिंवर कां पडत नाहीं व हिंवाळ्यामध्येच का पडते ह्याविषयी प्रथमतः विचार करू. मागे पावसाची उपपत्ति सांगते वेळीं शामदानाचा प्रयोग करून सिद्ध करून दाखविलेच आहे कीं, हवेमध्ये नियमित उष्णता असतां नियमितच वाफ राहू श-